पुणे : गोवा राज्य निर्मीत व गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी मद्यावर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाची धडक कारवाई करत 87 लाखांची वेदेशी मद्य जप्त (Foreign liquor confiscated) करण्यात आली (Action of State Excise Pune Department) आहे. विदेशी मद्याचा साठा घेवुन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीचा ट्रक जप्त करुन कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हा नोंद : वाहन चालक १) प्रवीण परमेश्वर पवार वय २४ वर्षे,( रा. मु.पो. तांबोळे ता. मोहोळ जि. सोलापूर ) २) देविदास विकास भोसले वय-२९ वर्षे (रा. मु.पो खवणी ता. मोहोळ जि. सोलापूर) यांना अटक करुन त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८१, ८३, ९०, १०३ व १०८ अन्वये आरोपीस अटक करुन त्यांचे विरुध्द गुन्हा नोंद केला आहे.
विदेशी मद्याचा साठा : राज्य उत्पादन शुल्क विभागाला बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तळेगांव विभाग, पुणे या पथकामार्फत आज तळेगाव दाभाडे शहराच्या हददीत, जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर, हॉटेल शांताई समोर रोडवर सापळा लावुन गोवा राज्य निर्मीती व केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचा साठा घेवुन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीचा ट्रक जप्त करुन कारवाई करण्यात आली (foreign liquor for sale in Goa) आहे.
मुद्देमाल जप्त : ट्रक क्र.एम एच ४६ एएफ - ६१३८ यांची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हयातील मुद्देमाल मिळुन आला. तो येणेप्रमाणे रिअल व्हिस्की ७५० मि.ली चे ४१६४ सीलबंद बाटल्या व रिअल व्हिस्की १८० मि.ली चे ५७६० सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की ७५० मि.ली चे ९६०० सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकुण १२६७ बॉक्स मिळुन आले. सदर जप्त मद्याची किंमत अं.रु.८७,८९,५२० एवढी असुन वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत अं.रु. १,०५,०७,५२० इतका किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (Action on foreign liquor for sale in Goa) आहे.