ETV Bharat / state

Action Against Fraud Teacher : बोगस शिक्षिकेवर कारवाई, खोट्या कागदपत्रांचा वापर करून मिळवली नोकरी

राज्यात शिक्षण मंडळाच्या वतीने बोगस शिक्षकांवर कारवाईची मोहीम सुरू असताना पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशन येथे एका बोगस शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिणीची बनावट कागदपत्रे वापरून शिक्षण अधिकारी झालेल्या बनावट शिक्षकाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.

Action Against Fraud Teacher
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे at
author img

By

Published : Apr 6, 2023, 6:36 PM IST

माहिती देताना आयुक्त

पुणे : पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशन येथे एका बोगस शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संगीता दत्तात्रय रुंगे हिला अटक केले असून किसन दत्तोबा भुजबळ विस्तार अधिकारी जिल्हा परिषद यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

शासनाची आर्थिक आर्थिक फसवणूक : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे जिल्हा परिषद पुणे येथे सेवेत असून विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर कार्यरत आहेत. 12 सप्टेंबर रोजी शिक्षण अधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद यांचे आदेश प्राप्त झाले. या आदेशामध्ये शिक्षण अधिकारी यांनी संगीता दत्तात्रय रूंगे उप शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीकंद पुणे यांचे विरुध्द तक्रारदार अमित झुरुंगे यांच्या तक्रारीनुसार संगीता रुंगे यांनी खोट्या नावाने बहीणीचे कागदपत्रे वापरून तसेच बनावट कागदपत्रे तयार करुन या आधारे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळवून शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे.

खोट्या कागदपत्रांचा वापर करून नोकरी मिळवली : संगीता रूंगे उपशिक्षिका यांनी मगरवस्ती वस्तीशाळेवर 12 जून 2006 ते फेब्रुवारी 2014 अखेर शिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी प्रशिक्षित अपर वेतन श्रेणीमध्ये काम करून आत्तापर्यंत वेतन घेत आहेत. संगीता रूंगे यांचे शिक्षण 11 वी पर्यंत झाले असून त्यांनी संगीता झुरूंगे यांच्या 12 वीच्या कागदपत्रे वापरून त्यांनी शिक्षक या पदावर काम केले आहे. तसेच मीच रूपाली ज्ञानेश्वर टिळेकर असून माझे नाव संगीता दत्तात्रय आहे. हे दाखविण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा वापर करून नोकरी मिळवली. सुमारे 16 वर्षापासून सातत्याने आत्तापर्यंत शासनाची रक्कम रुपये 40,62846/- इतक्या रकमेची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले की, याबाबत बोगस शिक्षिका बनावट कागपत्र वापरून शिक्षिका म्हणून कामावर रुजू झाल्या आहे. आत्ता बोगस शिक्षकांच्या बाबतीत शिक्षण आयुक्तांनी मोहीम सुरू केली असून याबाबत वेळोवेळी शिक्षकांची कागदपत्राची तपासणी केली जात आहे. यावर कडक कारवाई करण्यात येत आहे, असे देखील यावेळी मांढरे म्हणाले.

हेही वाचा : Tadoba Gambling News : ताडोबात जुगार खेळताना वन अधिकाऱ्याच्या चालकासह दोन कर्मचाऱ्यांना अटक; दुर्गापूर पोलिसांची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.