ETV Bharat / state

पुण्यातील सदाशिव पेठेत थरार..तरुणावर अॅसिड हल्ला करून गोळीबार, हल्लेखोरानेही संपविले जीवन - firing,

सदाशिव पेठेत एका तरुणावर अ‍ॅसिड हल्ला करत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. रोहित विजय थोरात (२५) असे अ‍ॅसिड हल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.

डावीकडे हल्यात जखमी रोहित तर उजवीकडून हल्लेखोर सिद्धराम कलशेट्टी
author img

By

Published : Apr 17, 2019, 12:48 AM IST

Updated : Apr 17, 2019, 10:00 AM IST

पुणे - सदाशिव पेठेत एका तरुणावर अ‍ॅसिड हल्ला करत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. रोहित विजय थोरात (२५) असे अ‍ॅसिड हल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर सिद्धराम विजयकुमार कलशेट्टी असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.

रोहितच्या आईने आरोपी विजयकुमार विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या अॅसिड हल्ल्यात त्याचा चेहरा आणि मान भाजली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुण्यातील सदाशिव पेठेत ही घटना घडली

सदाशिव पेठेतील एका बोळात रोहित त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत थांबला होता. यावेळी हल्लेखोर तरुणाने त्याच्यावर अॅसिड टाकले आणि गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

acid attack
रुग्णालयात दाखल करताना

दरम्यान आरोपीच्या मागे पोलीस जात असताना त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला होता. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तो डक्टमध्ये पडला. त्यामुळे त्याला बाहेर काढण्याचे आव्हान पोलीस आणि अग्निशमन दलासमोर होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले होते. हा हल्ला कोणत्या कारणावरुन केला अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:सदाशिव पेठेत तरुणावर अ‍ॅसिड हल्ल्यासह गोळबार, आरोपीही इमारतीत लपला, पोलीस घटनास्थळी दाखल

सदाशिव पेेठेत एका तरुणावर अ‍ॅसिड हल्ला करुन गोळीबार केल्याची घटना घडली आहे. रोहित विजय थोरात (वय-25) असे अ‍ॅसिड हल्ला झालेल्या तरूणाचे नाव आहे, तोंडापासून पोटापर्यंत रोहीत यामध्ये गभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला पुना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Body:सदाशिव पेठेतील एका बोळात रोहित खरात हा तरुण त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत थांबला असता अज्ञात तरुणाने त्याच्यावर अॅसिड टाकलं आणि गोळीबार केला. या अॅसिड हल्ल्यात रोहित खरातच्या चेहर्याला आणि पाठीला ईजा झाली असुन त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलय. त्यानंतर हल्लेखोर सदाशिव पेठेतील एका इमारतीत लपून बसला असुन पोलिस त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करतायंत. परंतु हल्लेखोराकडे पीस्तुल आहे...पोलीस घटनास्थळी दाखल...Conclusion:Ok
Last Updated : Apr 17, 2019, 10:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.