ETV Bharat / state

मृत पत्नीच्या प्रियकराचा खून करण्यासाठी कारागृहातून पलायन केलेला आरोपी जेरबंद - अशोक लक्ष्मण भाग्यवंत

२०११ ला आरोपी अशोकने आपल्या पत्नीचा अनैतिक संबंधातून खून केला होता. त्यानंतर त्याला पत्नीच्या खुना प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हा पासून आरोपी अशोक हा कारागृहात पत्नीच्या प्रियकराचा खून करण्याची योजना आखत होता.

आरोपी अशोक लक्ष्मण भाग्यवंत
author img

By

Published : Jul 22, 2019, 2:07 AM IST

पुणे- खून केलेल्या पत्नीच्या प्रियकराला ठार मारण्याचा उद्देशाने विसापूर कारागृहातून आरोपीने पलायन केल्याची घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास घडली होती. मात्र, वेळीच देहूरोड पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत पिंपरी-चिंचवडमध्ये आरोपीला ताब्यात घेतले आहे. अशोक लक्ष्मण भाग्यवंत (वय-२३) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

देहू रोड पालीस ठाणे

२०११ ला आरोपी अशोकने आपल्या पत्नीचा अनैतिक संबंधातून खून केला होता. त्यानंतर त्याला पत्नीच्या खुना प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हा पासून आरोपी अशोक हा कारागृहात पत्नीच्या प्रियकराचा खून करण्याची योजना आखत होता. अशोक सध्या विसापूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. रविवारी सकाळी मोकळ्या मैदानात शौचास बसतो, असे सांगून त्याने कारागृहाच्या मैदानातून पलायन केले आणि पत्नीच्या प्रियकराला ठार करायचे हे ठरवले.

त्याचे घर हे पिंपरी-चिंचवड शहरात असल्याने तो येथे येणार असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना विसापूर कागगृहातून देण्यात आली होती. त्यानुसार त्याच्या घराजवळ सापळा लावून संबंधित आरोपी अशोकला अगोदरच ताब्यात घेण्यात आले. मृत पत्नीचा प्रियकर हा परभणी येथे असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी कुटुंबाला भेण्यासाठी शहरात आला होता. त्यानंतर तो मराठवाड्यात जाऊन पत्नीच्या प्रियकराला जीवे ठार मारणार होता. परंतु, त्याचा मनसुबा देहूरोड पोलिसांनी हाणून पाडला आहे. सदरची कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांच्या मार्गदर्शना खाली देहूरोड पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, गायकवाड, पोलीस कर्मचारी सावंत, सात्रस,उगले, जाधव,परदेशी, तेलंग, शेजाळ, घारे यांनी केली आहे.

Intro:mh_pun_04_arrest_av_10002Body:mh_pun_04_arrest_av_10002

Anchor:- खून केलेल्या पत्नीच्या प्रियकराला जीवे ठार मारण्याचा उद्देशाने विसापूर कारागृहातून आरोपीने पलायन केल्याची घटना रविवारी सकाळी सात च्या सुमारास घडली होती. मात्र, वेळीच देहूरोड पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत पिंपरी-चिंचवडमध्ये आरोपीला ताब्यात घेतले आहे. अशोक लक्ष्मण भाग्यवंत वय-२३ असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २०११ ला आरोपी अशोक ने आपल्या पत्नीचा अनैतिक संबंधातून खून केला होता. त्यानंतर त्याला पत्नीच्या खुना प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हा पासून आरोपी अशोक हा कारागृहात पत्नीच्या प्रियकराचा खून करण्याची योजना आखत होता. अशोक सध्या विसापूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. रविवारी सकाळी मोकळ्या मैदानात शौचास बसतो असे सांगून त्याने कारागृहाच्या मैदानातून पलायन केले आणि पत्नीच्या प्रियकराला ठार करायचे हे ठरवले. त्याचे घर हे पिंपरी-चिंचवड शहरात असल्याने तो इथे येणार असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना विसापूर कागगृहातून देण्यात आली होती. त्यानुसार त्याच्या घराजवळ सापळा लावून संबंधित आरोपी अशोक ला अगोदरच ताब्यात घेण्यात आले. मयत पत्नीचा प्रियकर हा परभणी येथे असल्याचे पोलिसांनी सांगितले असून तो कुटुंबाला भेण्यासाठी शहरात आला होता, त्यानंतर तो मराठवाड्यात जाऊन पत्नीच्या प्रियकराला जीवे ठार मारणार होता. परंतु, त्याचा मनसुबा देहूरोड पोलिसांनी हाणून पाडला आहे. सदर ची कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांच्या मार्गदर्शना खाली देहूरोड पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, गायकवाड, पोलीस कर्मचारी सावंत, सात्रस,उगले, जाधव,परदेशी, तेलंग,शेजाळ, घारे यांनी केली आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.