पुणे - भारतात एका दिवसाला रस्त्यावरील अपघातांत मृत्यूची संख्या सरासरी ४१० इतकी आहे. जर नेहमीसारखीच परिस्थिती असती तर या सरासरीप्रमाणे गेल्या पंधरा दिवसांत जवळपास साडेसहा हजार लोक मृत्युमुखी पडले असते. लॉकडाऊनमुळे हे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झाले आहे.
पुणे शहरात साधारणता आठवड्यात अपघाताचे प्रमाणात हे १०० हून अधिक होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण १० टक्क्यावर आले आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये शहरातील सर्वच रस्ते बंद करण्यात आली आहे. नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये पुणे शहरात अपघातात मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे अपघात पूर्णपणे थांबले आहे, अशी माहिती संचेती हॉस्पिटलचे कॉन्सल्टंट ट्रॉमा सर्जन डॉ अतुल पाटील यांनी दिली आहे.