ETV Bharat / state

Accident On Pune Bangalore Highway : ट्रेलरनं टेम्पोला चिरडलं; पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार - ट्रेलरनं पीकअप टेम्पोला चिरडल्यानं भीषण अपघात

Accident On Pune Bangalore Highway : पुणे बंगळुरू महामार्गावर कंटेनर वाहून नेणाऱ्या ट्रेलरनं पीकअप टेम्पोला चिरडल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Accident On Pune Bangalore Highway
घटनास्थळावर टेम्पोचा झालेला चुराडा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 8:19 AM IST

Updated : Nov 18, 2023, 1:40 PM IST

पुणे Accident On Pune Bangalore Highway : पुणे-बंगळुरू महामार्गावर टँकरनं टेम्पोला चिरडल्यानं दोन वाहनांचे चालक ठार झाले. ही घटना जांभुळवाडीतील दरी पुलावर शनिवारी पहाटे घडली. या अपघातात आणकी चार नागरिक जखमी झाले आहेत. घटनास्थळावरुन ट्रेलर हटवण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती पुणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या ट्रेलरनं लक्झरी बस टेम्पो आणि कारला धडक दिल्यानं हा विचित्र अपघात घडला.

  • #UPDATE | Both the drivers of the vehicles were declared dead at the hospital after succumbing to serious injuries and four people received minor injuries. Traffic has been resumed on the highway after a trailer carrying containers rammed into a pickup tempo on the… https://t.co/nxEqDQ40zf

    — ANI (@ANI) November 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जांभुळवाडीतील दरी पुलावर चार वाहनांचा विचित्र अपघात : पुणे- बंगळुरू महामार्गावर ट्रेलरनं लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. या अपघाताची बातमी सकाळी 03.56 ला अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य केलं. घटनास्थळी पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून चार वाहनं दाखल झाली असून इतर चार जखमी नागरिकांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लोणावळा-खंडाळा महामार्गावर अपघात : मुंबई पुणे राष्ट्रीय मार्गावर लोणावळा ते खंडाळा दरम्यान असलेल्या महामार्गावर एक भरधाव कंटेनर पलटी होऊन त्याची धडक दोन दुचाकीना बसली. या अपघातात एका लहान मुलीसह दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर तीन जण जखमी झाले आहेत. आज दुपारी हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची अद्याप माहिती समोर आलेली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत. लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना दिवसभर जाण्यास बंदी असताना देखील आज दुपारी तीनच्या सुमारास पुण्याच्या बाजूकडून मुंबईच्या दिशेनं एक मोठा कंटेनर जात होता. लोणावळा शहरातून जुन्या महामार्गानं पुढं गेल्यानंतर समोरील वळणावर कंटेनर अचानक पलटी झाला. हा कंटेनर घसरत पुढं जाऊन लोणावळ्याच्या दिशेनं येणाऱ्या दोन दुचाकी गाड्यांना त्याची धडक बसली. या अपघातात एक लहान मुलगी आणि दोन जणांचा मृत्यू झाला तर एक लहान मूल आणि दोघंजण जखमी झाले आहेत.

हेही वाचा :

  1. Gorakhpur Kushinagar Highway Accident : गोरखपूर कुशीनगर महामार्गावर उभ्या बसला ट्रकची धडक; सहा प्रवाशांचा मृत्यू
  2. Mumbai Accident : सुरतहून मुंबईला आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा मृत्यू
  3. Accident on Bandra Worli Sea Link : वांद्रे वरळी सी लिंकवर सहा वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू, पाहा थरारक व्हिडिओ

Last Updated : Nov 18, 2023, 1:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.