पुणे - वाडा येथे बाजार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या गाडीला खेड तालुक्यातील साकुर्डी घाटात अपघात झाला. या अपघातात २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. सर्व जखमींना चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ३ ते ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
साकुर्डी तळपेवाडी कोयाळी गावातील नागरिक वाडा येथे बाजार करण्यासाठी गेले होते. परतीचा प्रवास करत असताना नागमोडी वळण असेलेल्या साकुर्डी घाटात पिकअप पलटून हा अपघात घडला आहे.
अपघातातील जखमींना चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली जखमींवर उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयात हलविण्यात आले आहे.