पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव वेगात मोटार (व्हॅन) चहाच्या दुकानात शिरली. दैव बलवत्तर असल्याने मोठा अपघात टळला असून यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनेत एकूण पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी निगडी पोलीस दाखल झाले असून वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरात भरधाव वेगात असलेली मोटार (व्हॅन) चहाच्या दुकानात शिरली. ही घटना आज सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास घडली. या घटनेत एकूण पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भरधाव वेगातील व्हॅन चालक हा दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना नियंत्रण सुटल्याने व्हॅन दुकानात शिरली. चहा प्यायला थांबलेल्या व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढला. दैव बलवत्तर असल्याने जीवितहानी ठळली. परंतु, घटनेत काही जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा - शिवनेरीच्या संवर्धनासाठी 23 कोटी मंजूर; अजित पवारांची घोषणा
हेही वाचा - शिवजंयतीसाठी गडावर आलेल्या तरुणीचा बुरुजावरून पडून मृत्यू