ETV Bharat / state

Ganesh Festival 2023 : पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर अयोध्येतील राम मंदिराची साकारणार प्रतिकृती

author img

By

Published : Jun 23, 2023, 11:12 AM IST

दगडूशेठ गणपती मंडळासमोर साकारलेला देखावा पाहण्यासाठी भाविक देशभरातून पुण्यात दाखल होता. त्यामुळे यावर्षी दगडूशेठ गणेश मंडळाने अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Ganesh Festival 2023
योध्येतील राम मंदिराची प्रतिकृती

पुणे : गणेशोत्सव म्हटले की पुणे आणि पुणे म्हटले की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आलेच. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासह मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेला देखावा पाहण्यासाठी जगभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने आगामी गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली.

पार पडला सजावटीचा शुभारंभ सोहळा : पुण्यातील सारसबाग येथील सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी पूजन कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या हस्ते झाले. ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

साकारणार 125 फूट उंच मंदिर : यंदाच्या वर्षी 131 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त जय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सवमंडपात श्रीं ची मूर्ती विराजमान होणार आहे. भाविकांना श्रीं सोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे देखील दर्शन होणार आहे. मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार हा 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. प्रतिकृतीमध्ये २४ खांब व 24 कमानी उभारण्यात येणार आहेत. मंदिराचा मुख्य घुमट 100 फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे 108 फूट उंच मंदिर असेल. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव 11 कळस असणार आहेत.

रामसेतू उभारुन रामायणातील घटनांचा आढावा : मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी असणार आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये रामायणातील घटनांचा आढावा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात येणार आहे. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात येणार आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हे देखील यंदाचे आकर्षण असणार आहे. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील लक्षवेधी ठरणार आहेत.

100 कारागिर दिवस रात्र करणार काम : सजावट विभागात 100 कारागिर दिवस-रात्र सलग 75 दिवस कार्यरत राहणार आहेत. मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येत असून यामुळे भाविकांना लांबून देखील सहजतेने श्रीं चे दर्शन घेणे शक्य होणार आहे. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, तर मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. Mangoes To Dagdusheth Ganapati: अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य; रुग्णालयात होणार प्रसादाचे वाटप
  2. Pushtipati Vinayak Jayanti 2023: दगडूशेठ गणपती मंदिरात पुष्टिपती विनायक जयंती मोठ्या उत्साहात साजरी; बाप्पाला 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.