ETV Bharat / state

खाकी कपडे घालून रोहित्र चोरणारी टोळी जेरबंद; तीन लाख साठ हजारांची रोहित्र केले हस्तगत

author img

By

Published : Nov 27, 2019, 12:34 PM IST

खाकी वर्दी घालून रोहित्र दुरुस्तीच्या बहाण्याने तीन चोरट्यांनी ३ लाख ६० हजार रुपयांचे रोहित्र लंपास केले. या प्रकरणी ठाण्यात दाखल तक्रारीवरून वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांनी आपण रोहित्र चोरी केल्याची कबुलीही दिली आहे.

transformer thieve
रोहित्र चोरणारी टोळी जेरबंद

पुणे - खाकी ड्रेस घालून रोहित्र चोरणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून ३ लाख ६० हजार रुपयांचे ४ रोहित्र हस्तगत करण्यात आले आहेत. वाकड पोलिसांकडे रोहित्र चोरीला गेल्याच्या २ तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार वाकड पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत होते. या घटनेप्रकरणी मुख्य आरोपी सुनील रघुनाथ कदम (४८), जबिर अब्दुल शेख (३२), हनुमंत सूर्यकांत माने (४३) या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी आपण रोहित्र चोरी केल्याची कबुली दिली आहे.

रोहित्र चोरणारी टोळी जेरबंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आनंदवन सोसायटी थेरगाव आणि ज्ञानदा कॉलनी वाकड येथून ३ लाख ६० हजार रुपयांचे रोहित्र अज्ञात चोरांनी लंपास केले होते. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात २ वेगवेगळ्या तक्रारी देण्यात आल्या होत्या. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले, तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्याकरता ३ पथकं तयार करण्यात आली. दरम्यान, बातमीदारामार्फत एक व्यक्ती खाकी कपडे घालून अन्य एका व्यक्तीसह रोहित्र घेऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा तपास केला असता ३ आरोपी मिळाले, त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुलीही पोलिसांना दिली.

हेही वाचा - पिसाळलेला कुत्रा चावल्याने महिलेचा मृत्यू

दरम्यान, मुख्य आरोपी सुनील कदम हा श्रीगोंदामध्ये २ वर्षांपूर्वी रोहित्र दुरुस्ती करण्याच्या दुकानात कामाला होता, त्यामुळे त्याला रोहित्रबद्दल माहिती होती. खाकी शर्ट पॅन्ट घालून तो रोहित्र दुरुस्त करायचे आहे असे सांगून क्रेनच्या सहाय्याने रोहित्र खाली घ्यायचा आणि पोबारा करायचा. या प्रकरणी सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, बापूसाहेब धुमाळ, बिभीषन कण्हेरकर, नितीन धोरजे, जावेद पठाण, विक्रम जगदाळे, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड, विजय गंभीरे, दीपक भोसले, श्याम बाबा, विक्रम कुदळे, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, सचिन नरुटे, तात्या शिंदे, सुरेश भोसले, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले यांच्या पथकाने केली.

हेही वाचा - भाजप नगरसेविकेकडून सुनेचा छळ, सांगवी पोलिसात गुन्हा दाखल

Intro:mh_pun_02_av_theft_wakad_mhc10002Body:mh_pun_02_av_theft_wakad_mhc10002

Anchor:- खाकी ड्रेस घालून रोहित्र चोरणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ३ लाख ६० हजार रुपयांचे चार रोहित्र हस्तगत केले आहेत. वाकड पोलिसांकडे रोहित्र चोरीला गेल्याच्या दोन तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार वाकड पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत होते. या घटने प्रकरणी मुख्य आरोपी सुनील रघुनाथ कदम वय-४८, जबिर अब्दुल शेख वय-३२, हनुमंत सूर्यकांत माने वय-४३ यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी आपण रोहित्र चोरी केल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आनंदवन सोसायटी थेरगाव आणि ज्ञानदा कॉलनी वाकड येथून ३ लाख ६० हजार रुपयांचे रोहित्र अज्ञात चोरांनी लंपास केले होते. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या तक्रारी देण्यात आल्या होत्या. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. परिसरातील सिसिटीव्ही तपासण्यात आले. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्या करीता तीन पथक तयार करण्यात आली. दरम्यान, बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की एक व्यक्ती खाकी कपडे घालून रोहित्र अन्य एका व्यक्तीसह घेऊन गेला होता अशी माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा तपास केला असता तीन आरोपी मिळाले. त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली पोलिसांना दिली.

दरम्यान मुख्य आरोपी सुनील रघुनाथ कदम हा श्रीगोंदमध्ये दोन वर्षांपूर्वी रोहित्र दुरुस्ती करण्याचे शॉपमध्ये कामाला होता. त्याला रोहित्र बद्दल माहिती होती. खाकी शर्ट पॅन्ट घालून, रोहित्र दुरुस्त करायचे आहे असे सांगून क्रेन च्या साहाय्याने रोहित्र खाली घ्यायचा आणि पोबारा करायचा. सदर ची कामगिरी वरीष्ट पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे राजकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, बापूसाहेब धुमाळ, बिभीषन कण्हेरकर, नितीन धोरजे, जावेद पठाण, विक्रम जगदाळे, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड, विजय गंभीरे, दीपक भोसले, श्याम बाबा, विक्रम कुदळे, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, सचिन नरुटे, तात्या शिंदे, सुरेश भोसले, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले यांच्या पथकाने केली .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.