पुणे: सध्या तरुणांमध्ये सोशल मीडिया वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तरुण तरुणींकडून रिल्स बनवणे तसेच विविध सोशल मीडिया आकाउंड वापरणे याचे प्रमाण वाढल्यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे अनेक चाहते तयार झाले आहेत. पण यातुनच पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घुलेनगर वडगांव बुद्रुक येथे रविवारी दुपारी फिर्यादी मुलगा व आरोपी मुलांमधे प्राणघातक मारामारी झाली.
ही सगळी मुले एकमेकांच्या परिचयाचे आहेत. गेल्या काही दिवसापुर्वीही त्यांच्यात वाद झाले होते. फिर्यादी मुलगा हा घुलेनगर येथील एका एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आला होता. त्याने इंस्टाग्रामवर ठेवलेल्या स्टेटस्चा राग मनात धरुन (over the status on Instagram) आरोपीं अल्पवयीन मुलांनी (gang of minors ) त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला (A friend was attacked). यावेळी त्या मुलाच्या डोक्याच्या पाठीमागे, दोन्ही हाताच्या मनगटावर वार करून त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे.
त्या मुलाला मारल्यानंतर टोळक्याने कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वडगाव बुद्रुक येथे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेची माहिती स्थानिकांकडून जमा करण्यात येत आहे. या प्रकरणी त्या मुलाच्या तक्रारी वरुन पोलिसांनी सहा जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असुन तीघांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा : एपीएमसी मार्केटमध्ये मित्राने केला मित्राचा खून; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद