ETV Bharat / state

'कोथिंबीर'ला कवडीमोल भाव; शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात सोडल्या मेंढ्या - Farmer loss Shirur taluka

कोथिंबीरला बाजारभाव मिळत नसल्याने शिरूर तालुक्यातील चांडोह येथील काळुराम रोकडे यांनी हाताश होऊन आपल्या तीन एकर शेतातील कोथिंबीर पिकात मेंढ्या सोडल्या. पिकाला भाव मिळत नसल्याने त्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Farmer cilantro crop damage Chandoh
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात सोडल्या मेंढ्या
author img

By

Published : Nov 21, 2020, 5:16 PM IST

पुणे - कोरोना आणि आवकाळी पावसाने हतबल झालेला बळीराजा आता कोथिंबीरला बाजारभाव मिळत नसल्याने हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील चांडोह येथील काळुराम रोकडे यांनी हाताश होऊन आपल्या तीन एकर शेतातील कोथिंबीर पिकात मेंढ्या सोडल्या आहेत. पिकाला भाव मिळत नसल्याने त्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात सोडल्या मेंढ्या

कोथिंबीरला चांगला भाव मिळेल, या आशेने रोकडे यांनी शेतात कोथिंबीर पीक उगवले होते. हे पीक चांगलेच बहरले. मात्र, सध्या कोथिंबीरला बाजारात एक ते दोन रुपये प्रति जुडा भाव मिळत आहे. यातून काढणीचाही खर्च मिळणार नाही. त्यामुळे, हाताश होऊन रोकडे यांनी आपल्या शेतात मेंढ्या सोडल्या.

कोथिंबीरला कवडीमोल किंमत..

लागवड झाल्यानंतर अडीच महिन्याने कोथिंबीर पीक विक्रीसाठी तयार होते. महागडी बियाणे, औषध फवारणी, मजुरी, वाहतूक असा आफाट खर्च करून शेतकरी कोथिंबीरची लागवड करतो. मात्र, त्यास १ ते २ रुपये प्रति जुडा असा बाजारभाव मिळतो. तर, कधी विक्रीही होत नाही, त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

हेही वाचा - व्यापारी शहा आत्महत्या प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.