ETV Bharat / state

Gautami Patil : गौतमी पाटील जोमात; बर्थ डे बॉय कोमात - Amit Shankar Lande

गौतमी पाटील यांच्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसतांनाही गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित केल्याने अमित लांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस दत्तात्रय बाळासाहेब कांबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात बर्थडेबाॅय फिर्याद दिली आहे.

Gautami Patil
Gautami Patil
author img

By

Published : May 24, 2023, 8:03 PM IST

गौतमी पाटील नृत्य करतांना

पिंपरी चिंचवड : सबसे कातिल गौतमी पाटील म्हटले की, तरुण-तरुणींमध्ये उत्साह असतो. गौतमी पाटील यांच्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे. आयोजक अमित शंकर लांडे यांनी गौतमी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. सोमवारी त्यांचा सार्वजनिक कार्यक्रमही होता. मात्र, परवानगीशिवाय कार्यक्रम ठेवल्याप्रकरणी बर्थडे बॉयचे आयोजक अमित लांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई दत्तात्रय बाळासाहेब कांबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भोसरी पोलिसात गुन्हा दाखल : अमित शंकर लांडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. सोमवारी सायंकाळी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विविध गाण्यांवर नृत्य करून गौतमीने पिंपरी-चिंचवडकरांची मने जिंकली. मात्र, आता बर्थडे बॉय असलेल्या अमित लांडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमासाठी अमित लांडे यांनी भोसरी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली. गौतमी पाटील यांचा जाहीर कार्यक्रम परवानगी नसतानाही मैदानावर आयोजित करण्यात आला. त्यामुळे अमित लांडे याच्यासह अन्य एकावर भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौतमीच्या नृत्याने तरुण घायळ : या वेळी गौतमी पाटील यांनी अप्रतिम गाण्यावर आपला परफॉर्मन्स दिला. धक- धक होतंय काळीज हे वेळ झाली. हुंडा नको मामा तुमची पोरगी द्या मला, कच- कच कांदा कापताना बोटं सुरीत वाचवली, अशा भन्नाट गाण्यांवर ताल धरून उपस्थित तरुण- तरुणींना पाटील यांनी घायाळ केले. गौतमीच्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिला, तरुणी, तरुण उपस्थित होते. अवघ्या पंधरा मिनिटात गौतमीने तिच्या निवडक गाण्यावर डान्स करून सगळ्यांची मने जिंकली. गौतमीला पाहण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त, बाऊन्सरचा गराडा देखील पाहायला मिळाला.

हेही वाचा -

  1. Uddhav Thackeray : राज्यात निवडणूक होणारच नाही; असे का म्हणाले उद्धव ठाकरे? घ्या जाणून...
  2. Arvind Kejriwal Met Uddhav Thackeray : आजपासून सत्ताधाऱ्यांना विरोधी म्हणा, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
  3. Court verdict :.... तर बायकोला पोटगीचा अधिकार नाही - उच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.