बारामती (पुणे) - खेळता-खेळता एका चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.अधिराज सागर आहेरकर (वय 3 वर्षे), असे मृत चिमुरड्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अधिराज हा तीन वर्षाचा चिमुरडा घरासमोरील अंगणात खेळत होता. घरातील मंडळी आपापल्या कामात व्यस्त होती. अचानक विहिरीत काहीतरी पडण्याचा आवाज आल्यानंतर घरातील मंडळी घराबाहेर आली. त्यावेळी त्यांना अधिराज आजूबाजूला दिसला नाही. हे लक्षात येताच अधिराजच्या वडिलांनी विहिरीत उडी घेतली. अधिराजला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यास बारामतीतील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी अधिराजवर तातडीने उपचार सुरू केले. त्याच्या पोटातील पाणी काढून त्याची तपासणी केली. मात्र, त्याचे शरीर कसलाच प्रतिसाद देत नव्हते. अखेर डॉक्टरांनी अधिराजला मृत घोषित केले. अधिराजच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - अवैध मासेमारी प्रकरणी सात जणांना अटक, इंदापूर पोलिसांची कारवाई