ETV Bharat / state

#कोरोना 'पॉझिटिव्ह' : पुण्यात 81 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात; 30 वर्षीय तरुणालाही डिस्चार्ज - pune corona cure patient

कोरोना बाधितांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यात रुग्णालयातील डॉक्टर्सच्या अथक परिश्रमाला यश आले आहे. एका 81 वर्षीय आजोबांनी कोरोनाविरूद्ध यशस्वी लढा देत त्यावर मात केली आहे.

पिंपरी-चिंचवड, पुणे
पिंपरी-चिंचवड, पुणे
author img

By

Published : May 16, 2020, 6:24 PM IST

पुणे - येथील 81 वर्षीय आजोबांनी कोरोनाविरूद्ध यशस्वी लढा देत त्यावर मात केली आहे. यासोबतच एका 30 वर्षीय तरूणालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

येथील कोरोना बाधितांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यात रुग्णालयातील डॉक्टर्सच्या अथक परिश्रमाला यश आले आहे. एका 81 वर्षाच्या रूग्णासह 30 वर्षाच्या युवकाला आज (शनिवारी) डिस्चार्ज देण्यात आला. वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आणि मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रविण सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कोवीड १९ बाधित या रूग्णांवर उपचार केले. दोन्ही रूग्णांची स्थिती खालावलेली असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. यात डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार आणि परिश्रमाने रूग्णांना बरे करण्यात यश आले.

हेही वाचा - कोरोनासंबंधीच्या कामातून दिव्यांग आणि वयस्कर शिक्षकांना मुभा

१४ दिवस रूग्णालयात उपचार केल्यानंतर आज (शनिवारी) त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यानंतर त्यांना १४ दिवस होम क्वारन्टाईन होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. हे दोन्ही रूग्ण पुण्यातील रहिवासी होते.

त्यांना निरोप देताना अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. प्रविण सोनी, डॉ. किशोर खिल्लारे, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. स्मिता पानसे, डॉ. कौस्तुभ कहाने, डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ. अक्षय शेवाळे, डॉ. वालिद, परिचारिका सुर्वे, संगीता पाटील आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.