पुणे : झील एज्युकेशन सोसायटी ही संस्था गेली २६ वर्षे शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मौल्यवान योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृती द्वारे मानवंदना दिली आहे. झील एज्युकेशन सोसायटी नेहमीच अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देण्यात अग्रेसर राहिली आहे. यावर्षी संस्थेचे ३७०० हून अधिक विदयार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. तसेच हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरीता संस्थेचे ५०० हून अधिक स्वयंसेवक गेल्या एक महिन्यापासून अथक परिश्रम घेत होते.
प्रतिकृती साकारून दिली मानवंदना : एकता आणि शांतता हा संदेश आपल्या देशाच्या युवा पिढी पर्यंत पोहचवणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. या उपक्रमामध्ये राष्ट्रध्वज, नेताजी सुभाष चंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांची मानवी प्रतिकृती साकारून मानवंदना देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पुणे शहराचे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाची दखल घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन हे देखील आले होते.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम : आम्ही गेल्या 4 वर्षापासून संस्थेच्या वतीने हा उपक्रम घेत आहोत. दरवर्षी विविध महापुरुषांची प्रतिकृती साकारून मानवंदना देण्यात येते. यंदा या उपक्रमामध्ये राष्ट्रध्वज, नेताजी सुभाष चंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांची मानवी प्रतिकृती साकारून मानवंदना देण्यात आली आहे. यामुळे एक वेगळीच ऊर्जा आम्हा विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे मत, यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
सगळीकडे महाराष्ट्र अव्वल : प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरात तब्बल सात वर्षांनंतर महाराष्ट्राच्या कॅडेट्सनी मानाचा तसेच सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान बॅनर पटकावला. शुक्रवारी झालेल्या एका दिमाखदार कार्यक्रमात हा बहुमान प्रदान करण्यात आला. या संचालनासाठी कोल्हापूरच्या सुद्धा तीन युवतींची निवड झाली होती. यातील श्रुती बाम या कोल्हापूरच्या वाघिणीने दिल्ली येथे पंतप्रधान बॅनर पटकावल्यानंतर दिलेली शिवगर्जना व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांकडून तिचे आणि तिच्यासोबत सहभागी कॅडेट्सचे कौतुक होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' तिघींची संचालनासाठी निवडप्रजासत्ताक दिन संचलनासाठी कोल्हापूर विभागातून एकूण 9 जणांची तर कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांची निवड झाली होती. दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण 57 कॅडेट्सची संचलन शिबिरासाठी निवड झाली होती. त्यातील 18 जणांना राजपथावर संचलन करण्याचा मान मिळाला. दरवर्षी होणाऱ्या संचलनात मानाचा पंतप्रधान बॅनर बहुमान कोण पटकावणार याची उत्सुकता असते. मात्र तब्बल 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले.