पुणे - जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा सातत्याने वाढणारा आकडा चिंताजनक आहे. 22 एप्रिलला मध्यरात्रीपर्यंत पुणे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 881 होती. यात वाढ होऊन 23 एप्रिल सकाळी 9 वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 934 झाली आहे.
मध्यरात्रीपासून सकाळी 9 पर्यंत पुणे जिल्ह्यात तब्बल 53 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा ५९ झाला आहे.