ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी आढळले 5 नवीन कोरोनाबाधित, एकूण आकडा 183

पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी, चिंचवड स्टेशन, जुनी सांगवी, चऱ्होली या परिसरात एकूण ५ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, एक जण पुण्यातील गाडीतळ येथील आहे.

http://10corona in pcmc.10.50.85:6060//finalout4/maharashtra-nle/thumbnail/15-May-2020/7202960_990_7202960_1589522056150.png
corona in pcmc
author img

By

Published : May 15, 2020, 11:45 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी दिवसभरात ५ जण कोरोनाबाधित आढळले असून एकूण संख्या १८३ वर पोहोचली आहे. तर, ९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. दरम्यान, ११६ जण कोरोनामुक्तदेखील झाले असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी, चिंचवड स्टेशन, जुनी सांगवी, चऱ्होली या परिसरात एकूण ५ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, एक जण पुण्यातील गाडीतळ येथील आहे. दरम्यान, बुद्धघोष सोसायटी जुनी सांगवी (न्यु युनीटी मेडिकेअर, जयराज रेसिडन्सी फेज १,–गणेश बेकरी,–वाघमारे रोड,–हर्षल इलेक्ट्रीकल्स,–शिवगंगा कॉम्प्लेक्स -न्यु युनीटी मेडिकेअर) शुभश्री हाऊसिंग सोसायटी, आकुर्डी (शुभश्री हौसिंग सोसायटी, जय गणेश हॉटेल, मदिना मशीद–सद्गुरु अपार्टमेंट–आकुर्डी मेन रोड–खंडोबा माळ चौक–आयनॉक्स रोड, गणेश व्हिजन,–हॉटेल आंगण-शुभश्री हाऊसिंग सोसायटी) परिसर मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.