ETV Bharat / state

ऊसाचे पाचट पेटवल्याने बिबट्यांच्या पाच बछड्यांचा होरपळून मृत्यू

बछड्यांचा मृत्यू झाल्याने या परिसरात असणारी बिबट्या मादी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांना पुढील काळात सतर्क राहावे लागणार आहे.

होरपळून मृत्यू झालेले बिबट्यांचे बछडे
author img

By

Published : Apr 3, 2019, 1:37 PM IST

Updated : Apr 3, 2019, 3:25 PM IST

पुणे - मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट होत असताना शेतात आश्रय घेणाऱ्या बिबट्याच्या पाच बछड्यांना जीव गमवावा लागला आहे. उसात पाचटाला लावलेल्या आगीत बिबट्याच्या पाच बछड्यांचा जळून मृत्यू झाला आहे. प्राणीप्रेमींना चटका लावणारी ही घटना पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे घडली आहे. मादी बिबट्या आक्रमक होण्याची भीतीने परिसरातील ग्रामस्थ सतर्क झाले आहेत.

सध्या खेड-आंबेगाव- जुन्नर शिरुर परिसरात ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आली आहे. अवसरी बुद्रुक येथील गोपीनाथ सखाराम गुंणगे यांच्या शेतात आज सकाळी ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी आले. तोडणी झाल्याने उसाच्या शेतातील पाचटाला आग लावण्यात आली.हे ऊसाचे पाचट जळत असताना बिबट्या मादीची पाच पिल्ले दडून बसली होती. काहीच वेळात आगीचे रौद्ररूप झाल्याने या बिबट्यांच्या पिल्लांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. बछड्यांचा मृत्यू झाल्याने या परिसरात असणारी बिबट्या मादी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांना पुढील काळात सतर्क राहावे लागणार आहे.

बिबट्यांच्या बछड्यांची मृत्युची घटना

बिबट्यांची बछडे उसात कशी आली असावी?
ऊस शेतीला जंगल समजून बिबट्याने तिथे वास्तव्य केले असावे, असा ग्रामस्थ अंदाज करत आहेत. त्यामुळे बिबट्याच्या अधिवासाचा व बछड्यांच्या संगोपनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा घटना घडून नये, यासाठी वनविभाग काय पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:Anc__ आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे उसाच्या शेताला लावलेल्या आगीत बिबट्याची पाच जिवंत पिल्ले जळून मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण परिसरात बिबट्याच्या बछड्यांच्या आगीत जळुन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे

Vo_सध्या खेड आंबेगाव जुन्नर शिरूर परिसरात ऊस तोडणी अंतिम टप्प्यात असून ऊस तोडणी झाल्यानंतर उसाच्या शेतातील पाचुटाला आग लावली जाते अशाच एका घटनेत अवसरी बुद्रुक येथील गोपीनाथ सखाराम गुंणगे यांच्या शेतात आज सकाळच्या सुमारास ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी आले असताना काही ठिकाणी उसाच्या शेतातील पाचुटाला आग लावली होती दरम्यान या उसाच्या पाचुट जळत असताना बिबट मादीची पाच पिल्ले दडून बसली होती काहीच वेळात आगीचे रौद्ररूप झाल्याने या बिबट्यांच्या पिल्लांनाचा आगीत जळून झाला आहे

बिबट मादीची चिमुकली पिल्ले आगीत जळुन मृत्यु झाल्याने या परिसरात असणारी बिबट मादी क्रोधीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे या परिसरात नागरिकांनी पुढील काळात सतर्क रहाण्याची गरज आहे.

Vo_ ऊस शेतीला जंगल समजून बिबट उसाच्या शेतात वास्तव्य करत असताना बिबट मादीची पिल्लेही ऊस शेतीचा आधार घेऊन वास्तव्य करत असताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असतानाही ऊस तोडणी झाल्यानंतर उसाच्या पाचुटाला आग लावली या आगीमध्ये बिबट्याची पाच जिवंत पिल्ले जळून मृत्युमुखी पडली आहे त्यामुळे बिबट्याच्या व बछड्यांच्या संगोपनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वनविभाग या घटनेकडे कशा पद्धतीने पाहणार आणि पुढील काळात काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

Byte__शेतकरी

Byte__ऊसतोड कामगारBody:ब्रेकिंगConclusion:
Last Updated : Apr 3, 2019, 3:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.