पुणे - शहरातील बंड गार्डन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ३० वर्षीय युवकाने बंड गार्डन पुलावरून नदीत उडी मारत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ( Suicide Bund Gardern Pune ) सुनील वसंत म्हस्के, असे या युवकाचे नाव आहे. ही घटना काल सायंकाळी घडली आहे.
सुनील हा एक डिलिव्हरी कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करत होता. ( Delivery Man Suicide Pune ) मात्र, काल त्याने उडी मारून आपलं जीवन संपवलं. येरवडा पोलिसांनी पंचनामा केला आहे. त्याच्या मृत्यूचं कारण अजून कळलेले नाही. पोलीस आता सुनीलच्या घरच्यांचा शोध आहेत. तसेच पोलिसांनी मृत युवकाची ओळख पटवण्याचे आवाहन देखील केले आहे.