पुणे - बालेवाडी येथील निकमार महाविद्यालय येथे कोरोनाबाधित आणि क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ३० पॉझिटिव्ह रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करुन ते पूर्णत: बरे झाले. त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रविवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बालेवाडीच्या निकमार महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ३० रुग्णांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांनमध्ये पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा समावेश आहे. यावेळी कोरोनाच्या विळख्यातुन पूर्णत: बरे झालेल्या रुग्णांचे अनुभव हे नक्कीच पुणे महानगरपालिका डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांना प्रेरणा देणारे आहेत. तसेच पुणे मनपा ने क्वारंटाईन सेंटरमध्ये दिलेल्या जेवणाची व्यवस्था, साफसफाई व इतर सुविधांबाबत या सर्वांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर, मनपा अति.आयुक्त रुबल अगरवाल, आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे, आदी उपस्तीत होते. पुणे जिल्ह्यात 2 हजार 830 बाधित रुग्ण असून 938 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रविवारी 193 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्ण 1 हजार 741 आहेत.