पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैद्य धंद्यांवर पोलिसांचे धाडसत्र सुरू असून आयटी हब मानल्या जाणाऱ्या हिंजवडीत 30 लाखांचा गुटखा सामाजिक सुरक्षा पथक आणि हिंजवडी पोलिसांनी पकडला आहे. ही कारवाई गुरुवार (दि. 9 डिसें.) दुपारच्या सुमारास करण्यात आली आहे.
दोन आरोपी ताब्यात; मुख्य आरोपी पसार
याप्रकरणी परशुराम चौधरी मेघवाल आणि ललित गोविंदराम खारोल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर या प्रकरणात दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी श्याम चौधरी हा पसार झाला आहे. दरम्यान, विकत घेतलेला माल कोणाकडून घेतला आहे याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून टाकला छापा
एक व्यावसायिक परवानगी नसलेला गुटखा अवैद्यरित्या विकत असून मोठ्या प्रमाणावर साठा केला असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना मिळाली होती. सामाजिक सुरक्षा पथकाने हिंजवडी पोलिसांसह सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे.
30 लाखांचा मुद्देमाल व दोन वाहन पोलिसांनी केले जप्त
छापा टाकल्यानंतर त्यांच्याकडून 30 लाखांचा गुटखा व दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्याम चौधरी हा पसार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा - आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढल्यावर भाजपचा प्रभाव पडत नाही - जयंत पाटील
हेही वाचा - कुठेही भाजप 'ईडी'चा वापर करते, 'ईडी'च भाजपला संपवेल - धनंजय मुंडे