ETV Bharat / state

देहूरोड पोलिसांच्या तत्परतेमुळे तीन वर्षीय चिमुकला बहिणीच्या कुशीत विसावला - missing boy in dehu of pune

रस्त्यावर तीन वर्षीय बालक हा रडत थांबला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याच्या जवळ कोणीच दिसत नव्हते. अखेर तो हरवला असल्याचा संशय पोलिसांना आला. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली. परंतु, त्याला काहीच सांगता येत नव्हते. तो फक्त त्याचे नाव सांगत होता. संबंधीत पोलीस कर्मचारी यांनी रावेत येथील परिसर वंशला घेऊन पिंजून काढला. तरीही त्याचे कुटुंबीय भेटत नव्हते.

देहूरोड पोलिसांच्या तत्परतेमुळे तीन वर्षीय चिमुकला बहिणीच्या कुशीत विसावला
author img

By

Published : Nov 7, 2019, 3:28 AM IST

पुणे- देहूरोड पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेला तीन वर्षीय चिमुकला अवघ्या दोन तासांच्या आत कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला आहे. वंश विलास चव्हाण असे या तीन वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. तो मंगळवारी घरा समोर खेळताना अचानक रस्त्याकडे गेला आणि रस्ता विसरला. रावेत चौक येथे तो रडत थांबला होता. तेव्हा गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तो नजरेस आला. त्यानंतर अवघ्या दोन तासात वंशला त्याच्या बहिणीच्या स्वाधीन केले.

देहूरोड पोलिसांच्या तत्परतेमुळे तीन वर्षीय चिमुकला बहिणीच्या कुशीत विसावला
पोलीस कर्मचारी नवीन चव्हाण, गुजर, नंदनलाल राऊत, संजय आंधळे हे रावेत चौक येथे गस्त घालत होते. तेव्हा, रस्त्यावर तीन वर्षीय बालक हा रडत थांबला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याच्या जवळ कोणीच दिसत नव्हते. अखेर तो हरवला असल्याचा संशय पोलिसांना आला. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली. परंतु, त्याला काहीच सांगता येत नव्हते. तो फक्त त्याचे नाव सांगत होता. संबंधीत पोलीस कर्मचारी यांनी रावेत येथील परिसर वंशला घेऊन पिंजून काढला. तरीही त्याचे कुटुंबीय भेटत नव्हते.दरम्यान, पोलीस कर्मचारी हे एका तीन वर्षीय मुलाला घेऊन त्याचे आई वडील शोधत असल्याचे वंशच्या बहिणीला समजले. बहीण पूजा पवार हिने वेळ न दवडता रावेत चौकीला गेली. तिथे गेल्यानंतर आपला छोटा भाऊ वंश दिसताच तीला भरून आले. वंशच्या वडिलांचे निधन झाले आहे. तर आई रावेत परिसरात दुसऱ्या ठिकाणी राहते. वंश हा बहिणीकडे राहण्यास आला होता. घरासमोर खेळत असताना अचानक तो रस्त्यावर आला आणि घरी जाण्याचा रस्ता विसरला. मात्र ऐन वेळी वंश पोलिसांना दिसला आणि अवघ्या दोन तासांतच तो आपल्या बहिणीच्या कुशीत विसावला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार, संजय आंधळे, नवीन चव्हाण, गुजर, नंदलाल राऊत यांनी केली आहे.

Intro:mh_pun_01_av_3year_boy_mhc10002Body:mh_pun_01_av_3year_boy_mhc10002

Anchor:- देहूरोड पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याला त्याचे कुटुंब अवघ्या दोन तासात मिळालेय, तो बहिणीच्या कुशीत विसावला. वंश विलास चव्हाण अस तीन वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. तो मंगळवारी घरा समोर खेळता ना अचानक रस्त्याकडे गेला आणि रस्त्या विसरला. रावेत चौक येथे तो रडत थांबला होता तेव्हा गस्त घालत असलेल्या पोलीस कर्मचारी यांनी वंश ला पाहिले. त्यानंतर अवघ्या दोन तासात वंश ला त्याच्या बहिणीकडे सुखरूप स्वाधीन केले.

सविस्तर माहिती अशी की, पोलीस कर्मचारी नवीन चव्हाण, गुजर, नंदनलाल राऊत, संजय आंधळे हे रावेत चौक येथे गस्त घालत होते. तेव्हा, रस्त्यावर तीन वर्षीय वंश हा रडत थांबला असल्याचे पाहिले. त्याच्या जवळ कोणी दिसत नव्हते. अखेर तो हरवला असल्याचा संशय पोलिसांना आला त्याच्याकडे अधिक माहिती विचारली परंतु त्याला काही बोलता येत नव्हते, केवळ तो त्याच नाव सांगत असे. संबंधित पोलीस कर्मचारी यांनी रावेत येथील परिसर वंश ला घेऊन पिंजून काढला. तरी ही वंश ला त्याचे कुटुंब भेटत नव्हते.

दरम्यान, पोलीस कर्मचारी हे एका तीन वर्षीय मुलाला घेऊन त्याचे आई वडील शोधत असल्याचे वंश च्या बहिणी ला समजले. बहीण पूजा पवार हिने वेळ न दवडता रावेत चौकी ला गेली. तिथे गेल्यानंतर आपला छोटा भाऊ वंश दिसताच त्यांना भरून आले. वंश च्या वडिलांचे निधन झाले आहे. तर आई रावेत परिसरात दुसऱ्या ठिकाणी राहते. वंश हा बहिणीकडे राहण्यास आला होता. घरा समोर खेळत असताना अचानक रस्त्यावर आला आणि घरी जाण्याचा रस्ता विसरला. मात्र येन वेळी वंश पोलिसांना दिसला आणि अवघ्या दोन तासातच वंश आपल्या बहिणीच्या कुशीत विसावला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार पोलीस, संजय आंधळे, नवीन चव्हाण,गुजर, नंदलाल राऊत यांनी केली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.