ETV Bharat / state

फसवणुकीचा एक असाही फंडा; व्हॉट्सअॅपवरून मैत्रिणीलाच घातला ३ लाखांचा गंडा - पुणे

व्हॉट्सअॅपवर अनोळखी व्यक्तीकडून तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे त्यांना केलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फाईल फोटो
author img

By

Published : Jul 13, 2019, 4:55 PM IST

पुणे - व्हॉट्सअॅपवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच पहागात पडली आहे. मौल्यवान भेटवस्तू पार्सल पाठवल्याचे सांगून एका महिलेला तब्बल ३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोन जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरी पोलीस ठाणे

कल्पना नाईक (वय-४५) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांची शिवम पुजारी नावाच्या व्यक्तीसोबत व्हॉट्सअॅपवरून ओळख झाली. त्यानंतर त्याने मौल्यवान भेटवस्तू पार्सल करून पाठविल्याचे कल्पना यांना व्हॉट्सअॅवरूनच सांगितले. तसा मसेज देखील कल्पना यांना मिळाला. त्यानंतर संबंधित पार्सल दिल्ली एअरपोर्ट येथे आल्याचा फोन कस्टम अधिकारी म्हणून नेहा गुप्ता नावाच्या मुलीने केला. त्यामुळे कल्पना यांचा विश्वास बसला.

पार्सल पाहिजे असल्यास ३९ हजार ८०० रुपये भरावे लागतील, असे नेहाने त्यांना फोन करून सांगितले. त्यांनी कुठलाही विचार न करता ऑनलाईन पद्धतीने नेहाच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर पार्सल जास्त पैशांचे आहे, तुमच्यावर मनी लॉड्रींगची केस होऊ शकते, अशी भीती नेहाने दाखवली. त्यामुळे पुन्हा ४ ते ५ लाख रुपये भरावे लागणार असल्याचे नेहाने सांगितले. त्यावेळी भितीपोटी कल्पना यांनी तब्बल १ लाख १५ हजार रुपये भरले. मात्र, ही रक्कम कमी असून पुन्हा तुम्हाला पैसे भरावे लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कल्पना यांनी पुन्हा १ लाख ४० हजार रुपये भरले. मात्र, वारंवार पैशांची मागणी होत असल्याने फसवणूक झाल्याचे कल्पना यांच्या लक्षात आले.

कल्पना यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार कस्टम अधिकारी म्हणून सांगणारी नेहा गुप्ता आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज करणारा शिवम पुजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन्ही आरोपी मोकाट असून त्यांचे बँक खाते नागालँड येथील असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पिंपरी पोलीस आणि सायबर सेल करत आहे.

दरम्यान व्हाट्सअॅपवर अनोळखी व्यक्तीकडून येणारे मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Intro:mh_pun_02_ whatsapp_fraud_av_10002Body:mh_pun_02_ whatsapp_fraud_av_10002

Anchor:- व्हाट्सऍप वरील ओळख एका महिलेला चांगलीच पहागात पडली असून तिची तब्बल तीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कल्पना नाईक वय-४५ अस फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी पिंपरी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार शिवम पुजारी आणि नेहा गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाट्सऍप वरून ओळख झालेला आरोपी शिवम याने फिर्यादी यांना मौल्यवान भेटवस्तू पार्सल करून पाठविल्याचे व्हाट्सऍप द्वारे सांगितले, तसा मॅसेज ही कल्पना यांना मिळाल्याने त्यांनी त्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर सदर पार्सल हे दिल्ली एअरपोर्ट येथे आल्याचा फोन कस्टम अधिकारी म्हणून आरोपी नेहा गुप्ता हिने केला. त्यामुळे कल्पना यांचा अधिकच विश्वास बसला. तुम्हाला पार्सल हवं असल्यास ३९ हजार ८०० रुपये भरावे लागतील अस नेहाने फोनद्वारे कल्पना यांना सांगितले त्यांनीही कुठला विचार न करता पैसे ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर पुन्हा नेहा गुप्ता यांनी फोन करून पार्सलमध्ये जास्त पैसे आहेत तुमच्यावर मनीलॉंड्रिगची केस होऊ शकते अशी भीती दाखवून तुम्हाला ४ ते ५ लाख भरावे लागतील अस म्हणाली. त्यावेळी भीतीपोटी कल्पना यांनी तब्बल १ लाख १५ हजार रुपये भरले. त्यानंतर आणखी ही रक्कम कमी आहे असं म्हणून १ लाख ४० हजार रुपये भरण्यास सांगितले. परत परत पैश्याची मागणी होत असल्याने आपली फसवणूक होत असल्याचे कल्पना यांच्या लक्षात आले. परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. याप्रकरणी कस्टम अधिकारी म्हणवणारी नेहा गुप्ता आणि व्हाट्सऍपवर ओळख झालेल्या शिवम पुजारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी व्हाट्सऍपवर येणारे अनोखी मॅसेज आणि भेटवस्तू पाठवली आहे अश्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अस आवाहन केले आहे. त्यातून तुमची फसवणूक होऊ शकते अस देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे जागृत राहण्याची गरज नागरिकांना आहे. दरम्यान, दोन्ही आरोपी हे मोकाट असून त्यांचे बँक खाते हे नागालँड येथील असल्याचे समोर आले आहे. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस आणि सायबर सेल करत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.