ETV Bharat / state

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात 3 कोरोनाग्रस्त आढळले; एकूण रुग्णसंख्या 5 - corona cases in ambegaon

आंबेगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5 झाली आहे. याआधी साकोरे व शिनोली गावात प्रत्येकी एक रुग्ण सापडला होता. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असेदेखील प्रशासनाकडून सागंण्यात आले आहे.

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात 3 कोरोनाग्रस्त आढळले; एकूण रुग्णसंख्या 5पुण्यातील आंबेगाव तालुक्यात 3 कोरोनाग्रस्त आढळले; एकूण रुग्णसंख्या 5
author img

By

Published : May 24, 2020, 10:04 PM IST

पुणे - जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आज तब्बल तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामध्ये निरगुडसर, जवळे व शिनोली गावांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान हे तिघेही पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट प्राप्त झाले. प्रशासनाने या गावांच्या सीमा सील करून संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनादेखील क्वारंटाईन करून घेतले असून त्यांची तपासणी सुरू आहे.

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात 3 कोरोनाग्रस्त आढळले; एकूण रुग्णसंख्या 5

आंबेगाव तालुक्यात आढळून आलेले सर्व रुग्ण मुंबईवरून गावाला आले आहेत. यातील निरगुडसर येथील आढळून आलेला रुग्ण पोलीस खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. पुतणीच्या लग्नासाठी ते घाटकोपरहून कुटुंबासह गावी आले होते. हळदीच्या कार्यक्रमात सर्वजण एकत्र होते. या घटनेमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गावकऱ्यांशी संपर्क साधून सूचना दिल्या आहेत. हळदी समारंभाला उपस्थित असलेल्या 61 जणांना होम क्वारंटाईन करण्याचे नियोजन केले आहे. साकोरे येथील रुग्ण भाजीपाला विक्रेता तर शिनोलीचा रुग्ण ड्रायव्हर आहे.

दरम्यान, आंबेगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5 झाली आहे. याआधी साकोरे व शिनोली गावात प्रत्येकी एक रुग्ण सापडला होता. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असेदेखील प्रशासनाकडून सागंण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.