पुणे - मिशन बिगेन अंतर्गत पुण्यात महापालिकेच्यावतीने आजपासून काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यात 25 टक्के सार्वजनिक वाहतूक असलेली पीएमपीएमएल सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार पीएमपीएमएल तीन एप्रिलपासून बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच पीएमपीएमल सुरू होती. राज्यासह शहरात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर हळूहळू निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात 13 आगारांमध्ये 169 मार्गावर 416 बसचे नियोजन करण्यात आले.
पुण्यात अनलॉकला सुरुवात; आजपासून शहरात 25 टक्के पीएमपीएमएल बसेस धावणार - PMPML bus pune news
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरात मार्च एप्रिल महिन्यात पून्हा निर्बंध लावण्यात आले. त्या निर्बंधात पीएमपीएमएल देखील बंद करण्यात आली. त्यानंतर राज्यात कोरोनाचे रुग्ण जस जसे कमी होत गेले तस तसे निर्बंध शिथिल करण्यात आले.