ETV Bharat / state

बारामतीत बेजबाबदार वाहनचालकांकडून तब्बल २४ लाख दंड वसूल - बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई राहणार सुरूच..

कोरोनाचा धोका असतानाही वाहनांसह रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांविरुध्द बारामती पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या ३ हजार ४१ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत तब्बल २४ लाख ४३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

irresponsible drivers in Baramati ...
वाहनचालकांकडून तब्बल २४ लाख दंड वसूल
author img

By

Published : Nov 25, 2020, 7:25 PM IST

बारामती - कोरोनाला अटकाव घालण्यासाठी मागील आठ महिने राज्यात टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही अटी घालून काही व्यवहार सुरू करण्यात आले. याचा गैरफायदा घेत नागरिकांनी पुन्हा गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. शहरात नागरिकांसह वाहनांची गर्दी वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर बेजबाबदार वाहनचालकांवर पोलिसांनी दंडाचा बडगा उगारला आहे.

शहरातील बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या ३ हजार ४१ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत तब्बल २४ लाख ४३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये विनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, नो पार्किंग, वेगात वाहन चालविणे, विरुद्ध बाजूने ड्रायव्हिंग, विनाहेल्मेट गाडी चालविणाऱ्यांकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची कारवाई १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान केली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

हेही वाचा - कामगार संघटनांच्या २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी बंदला काँग्रेसचा पाठिंबा - बाळासाहेब थोरात

कोरोनाचे नागरिकांना गांभीर्य नाही....

टाळेबंदीचे नियम शिथिल केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांची संख्या शहरात वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरात अद्यापही कोरोनाचे सावट असतानाही नागरिक व वाहनचालकांना याचे कसलेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. मास्क न वापरणे, ट्रिपल सीट गाडी चालविणे, चारचाकी वाहनांमध्ये तीन पेक्षा अधिक नागरिकांनी प्रवास, विनाकारण चौका चौकात गर्दी करणे. हे प्रकार अद्यापही शहरात मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई राहणार सुरूच...

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहील, अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.

हेही वाचा - पटेलांच्या रुपाने काँग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला; मुख्यमंत्र्यांसह इतरांनी वाहिली श्रद्धांजली..

१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान केलेल्या दंडात्मक कारवाया....

मोटारवाहन कायदा केसेस दंड

विना परवाना वाहन चालविणे १२३४ ६१,७०००

ट्रीपल सीट १९१ ३८२००

मोबाईलचा वापर ३८७६००

नो पार्किंग ४८५६ ९७१२००

वेगात वाहन चालविणे १७५ १७५०००

राँग साईड ड्रायव्हिंग ०३ ३०००

विना हेल्मेट ११ ५५००

इतर केसेस ३०४१ ६२६४००

एकूण - ६५०८ २४४३९००

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.