दौंड (पुणे) - तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी ५१ गावांतून एकूण २ हजार १२३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज दौंड तहसीलदार कार्यालयात मोठी गर्दी इच्छुक उमेदवारांनी केली होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी
आज दौंड तहसीलदार कार्यालयात तालुक्यातील विविध गावातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची एकच लगबग सुरू होती. काही जणांची कागदपत्रे जुळवण्यासाठी तर पॅनेल प्रमुखांची आपल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज योग्य रितीने दाखल करावेत, यासाठी प्रयत्न केले.
५१ गावातून एकूण २१२३ उमेदवारांनी केले अर्ज दाखल
दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार दिनांक २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत याकाळात निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले. आज शेवटच्या दिवशी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत तालुक्यातील ५१ गावातून एकूण २१२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम
ग्रामपंचायत निवडणूकीची नोटीस १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे. दिनांक २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत सकाळी ११ ते ३ या वेळेत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत. ३१ तारखेला अर्जाची छाननी आहे. तर ४ जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. तर ४ जानेवारीला चिन्ह वाटप होणार आहे. निवडणुक १५ जानेवारीला आहे आणि मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे.
हेही वाचा - लोणावळ्याकडे पर्यटकांची पाठ! गर्दी ओसरली
हेही वाचा - थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त