शिरूर (पुणे) - तालुक्यातील कवठे येमाईच्या माळवदे वस्तीत ट्रक्टर शेतात नेण्याच्या वादातून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारी झाली. यात एका 20 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रवींद्र माळवदे असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. या मारहाणीत मृत रविंद्र यांच्या कुटूंबातील ७ जण जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या गटातील २ जण जखमी झाले आहेत. जखमींवर शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेतीचा हा वाद गेला विकोपाला -
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील माळवदे वस्ती येथील भावकी मध्ये शेतीचा हा वाद होता. याबाबत जमिनीची मोजणी झाली होती. परंतु सोमवारी दुपारच्या दरम्यान हा वाद टोकाला गेला. रवींद्र माळवदे याच्या डोक्याला धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. परस्पर विरोधी तक्रारी दिल्या असून गुन्हा दाखल दाखल करण्यात येत आहे. दोन्ही गटाच्या लोकांना यात गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना शिरूर येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे. घटनास्थळाला शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलीस उपनिरीक्षक बिरुदेव काबुगडे यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे.
हेही वाचा - मद्यपीने तरुणाच्या डोक्यात फोडली बिअर बाटली; घटना सीसीटीव्हीत कैद