ETV Bharat / state

शॉर्टकट घेणं बेतले जीवावर ; पुण्यात रेल्वे रूळ ओलांडताना दोघांचा मृत्यू - नागरिक

महेंद्र हा मळवली रेल्वे स्थानकातून शॉर्टकट घेऊन रेल्वे रूळ ओलांडत असताना अनोळखी सतिष ने पाऊस येत असल्याने महेंद्रच्या छत्रीत आसरा घेतला.

रेल्वे रूळ ओलांडताना दोघांचा मृत्यू.
author img

By

Published : Jul 6, 2019, 2:11 PM IST

पुणे - रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट दोघांच्या जीवावर बेतला आहे. खासगी शिकवणीसाठी जात असलेल्या एका मुलाचा आणि अन्य एका व्यक्तीला पुणे-इंदौर या एक्सप्रेस गाडीने जोरदार धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना मळवली येथे शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. महेंद्र चौधरी (वय-१३ रा. मळवली), सतीष शिवराम हुलवळे (वय-३२ रा. कार्ला) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

2 people died in railway acceident in pune
रेल्वे रूळ ओलांडताना दोघांचा मृत्यू.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेंद्र हा मळवली रेल्वे स्थानकातून शॉर्टकट घेऊन रेल्वे रूळ ओलांडत असताना अनोळखी सतिषने पाऊस येत असल्याने महेंद्रच्या छत्रीत आसरा घेतला. दोघे ही रेल्वे रूळ ओलांडून पुढे जात असताना भरधाव वेगात असणाऱ्या पुणे-इंदौर या एक्सप्रेसने दोघांना जोरात धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, दोघांना रेल्वे स्थानकातील नागरिकांनी मोठ्याने आवाज दिला होता. मात्र, पाऊस जास्त असल्याने त्यांच्या पर्यंत आवाज पोहचला नाही असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. घटनेचा अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Intro:mh pun 01 railway accident 10002Body:mh pun 01 railway accident 10002

Anchor:- रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट दोघांच्या जीवावर बेतला आहे. खासगी शिकवणीसाठी जात असलेल्या मुलाचा आणि अन्य एका व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना मळवली येथे शुक्रवारी पाऊने चार च्या सुमारास घडली आहे. महेंद्र चौधरी वय-१३ रा. मळवली, सतीष शिवराम हुलवळे वय-३२ रा. कार्ला अशी अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे आणि व्यक्तीचे नाव आहे. पुणे-इंदौर या एक्सप्रेस गाडीने जोरदार धडक दिली यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महेंद्र हा मळवली रेल्वे स्थानकातून शॉर्टकट घेऊन तो रेल्वे रूळ ओलांडत पुढे जाणार तेवढ्यात अनोळखी संतोष ने पाऊस येत असल्याने मयत महेंद्र च्या छत्रीत आसरा घेतला. दोघे ही रेल्वे रूळ ओलांडून पुढे जात असताना भरधाव वेगात असणाऱ्या पुणे-इंदौर या एक्सप्रेस रेल्वे गाडीने दोघांना जोरात धडक दिली. यात दोघांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोघांना रेल्वे स्थानकातील नागरिकांनी मोठ्याने आवाज दिला होता. मात्र पाऊस जास्त असल्याने त्यांच्या पर्यंत आवाज पोहचला नाही अस रेल्वे पोलिसांनी सांगितले. घटनेचा अधिक तपास रेल्वे अधिकारी करत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.