पुणे - जुन्नर तालुक्यातील कल्याण नगर महामार्गावरील डुंबरवाडी टोलनाक्याजवळ दुचाकी व पिकअपचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. जयराम मधे व राजेंद्र मधे (दोघेही रा. नाचणठाव, ता. अकोले ), असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
हेही वाचा - BS-4 वाहन घेताना ही घ्या काळजी; 31 मार्चनंतर नोंदणी होणार बंद
कल्याण नगर महामार्गावर डुंबरवाडी टोलनाक्याजवळ दुचाकी व पिकअपचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी चालक जयराम मधे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेल्या राजेंद्र मधे हे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना आज दुपारी डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणाचा अधिक तपास ओतूर पोलीस करत आहेत. दरम्यान, कल्याण नगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने स्थानिक नागरिक व प्रवासी यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
हेही वाचा - गँगस्टर छोटा राजनच्या पुतणी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल