पुणे - कोरोना संसर्गामुळे देशभरातील नागरिकांचे जनजीवन ठप्प झाले आहे. याचा सामाजिक स्तरावर परिणाम झाला असून अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा सांस्कृतिक क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. लॉकडाऊनमुळे सांकृतिक क्षेत्र पूर्णपणे बंद आहे. यानंतर आता महाराष्ट्र साहित्य परिषदेनेही यंदाचा वर्धापनदिन रद्द केला आहे.
महाराष्ट्र साहित्य संस्था ही मराठी साहित्यातील आद्य संस्था मानली जाते. या संस्थेच्या माध्यमातून मराठी साहित्य निर्मिती, त्याचे जतन आणि संवर्धनाचे काम केले जाते. मराठी भाषेसाठी विविध कार्यक्रमही संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले जातात. त्यामुळे, संस्थेचा वर्धापनदिन हा मराठी साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वाची बाब आहे. मात्र, कोरोनाचा फटका या कार्यक्रमालाही बसला आहे.
गेली 114 वर्षे ही संस्था मराठी भाषेसाठी काम करत असून यंदा संस्थेचा 114 वा वर्धापन दिन आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 114 व्या वर्धापनदिनानिमित्त 26 आणि 27 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.