पुणे - सध्या कडाक्याच्या उन्हामुळे लहान मुलांसह नागरिकांची पाण्यामध्ये पोहण्यासाठीची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे भीमा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नागेश दिलीप गायकवाड असे मृत्यू मुलाचे नाव आहे.
आज सकाळच्या सुमारास नागेश कोरेगाव-भीमा येथील भीमा नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता. नागेश काही वेळात खोलवर पाण्यात गेला असता पोहता न आल्याने पाण्यात बुडाला. परिसरातील नागरिकांनी नागेशला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे उघड झाले. दरम्यान नागेश गायकवाड हा कोरेगाव-भीमा येथील रहिवासी असून त्याची आई मतिमंद तर वडील अंध आहेत.