पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहर हे गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली झोन एक मधून 13 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आल आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर एका अपद्वारे लक्ष ठेवल जाणार असून दररोज त्यांची त्या अपद्वारे हजेरी घेतली जाणार आहे. त्यामुळं सराईत आरोपी कुठे आहेत हे समजणार आहे.
![पिंपरी सराईत गुन्हेगार तडीपार न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-01-avb-tadipar-mh10024_29012021134928_2901f_01238_737.jpg)
हेही वाचा - तलवारीने केक कापणे पडले महागात; २ युवकांना अटक
एकूण 44 गुंड पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहेत
31 डिसेंम्बर रोजी झोन 1 मधून 24 गुन्हेगार तडीपार केले होते. आणखी 13 गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत. आतापर्यंत झोन एक मधून एकूण- 44 जणांना तडीपार करण्यात आलं आहे. खुनाचा प्रयत्न, खंडणी, चोरी, असे गुन्हे असलेले सराईत गुन्हेगार तडीपार केले आहेत. भविष्यात देखील अशा प्रकारे आणखी गुन्हेगार तडीपार करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अॅपद्वारे तडीपार गुंडांवर ठेवता येणार लक्ष
पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची एका अॅपद्वारे हजेरी घेण्यात येणार आहे. जेणेकरून ते कुठल्या क्षेत्रात आहेत, हे समजेल. त्यांच्यावर लक्ष ठेवता येणार आहे.
हेही वाचा - सांगलीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय; पोलीस निरीक्षकासह 6 जणांना अटक