मंचर (पुणे) - मंचर उपजिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. या ठिकाणी व्हेंटिलेटरची अत्यंत गरज आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यां.नी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत तालुक्यातील ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून मंचर उपजिल्हा रुग्णालयाला तेरा व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहे.
हेही वाचा - 'परिवहन महामंडळाच्या वतीने 500 गाड्या खासगी तत्वावर देणे चुकीचे'
उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या वेळी प्रांताधिकारी सारंग कोडलकर, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अंबादास देवमाणे, डॉ. सुरेश ढेकळे, बाजार समितीचे अध्यक्ष देवदत्त निकम, उपसरपंच युवराज बाणखेले व दानशूर व्यक्ती उपस्थित होते.
दानशूर व्यक्ती एकत्र येऊन दिलेल्या मदतीमुळे रुग्णांना चांगले उपचार देण्यास मदत होणार असून रुग्णलयाच्या वतीने सर्वांचे आभार उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अंबादास देवमाणे यांनी मानले.
हेही वाचा - मोहिनी एकादशी निमित्ताने ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट