पुणे - डॉक्टरांसह सर्व महिला कर्मचारी असलेल्या राजगुरूनगर येथील डेडीकेट कोविड हेल्थ सेंटरमध्ये गुरुवारी १३ कोरोनाबाधित रुग्णांनी यशस्वी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांवर फुलांचा वर्षाव करीत गुलाबपुष्प देत, टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला.
जिल्हा परिषद पुणे, पंचायत समितीच्या माध्यमातून राजगुरूनगर येथे पवार रुग्णालयात डेडीकेट कोव्हीड हेल्थ सेंटर (DCHC) सुरु करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या रुग्णालयात महिला डॉक्टरसह सर्व कमर्चारी महिला असून महिलांद्वारे चालविण्यात येत असलेले हे देशातील पहिलेच डेडीकेट कोव्हीड हेल्थ सेंटर आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी हे सेंटर जिल्हा परिषदेने सुरु केले. पॉझिटिव्ह असलेले परंतु जास्त लक्षण नसलेल्या बाधित व्यक्ती या हॉस्पिटमध्ये उपचार घेत आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये 24 वाहनांची तोडफोड; तिघे पोलिसांच्या ताब्यात
गुरुवारी पहिल्यांदाच या डेडीकेट कोव्हीड हेल्थ सेंटरमधून 13 रुग्णांना डिस्चार्ज देत घरी सोडण्यात आले. सध्या या रुग्णालयात 45 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहे. या कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये ३ महिला डॉक्टरसह 14 महिला कर्मचारी कोरोना योद्धा म्हणुन आपले कर्तव्य पार पाडत आहे. कोरोनाबाधितांनी रुग्णालयातुन निरोप घेतला यावेळी सभापती अंकुश राक्षे, डॉ. शीतल पवार यांच्यासह सर्व महिला कर्मचाऱ्यांनी रुग्णांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.
कोरोना काळात महिला डॉक्टर, परिचारीका,वार्ड कर्मचारी म्हणुन सर्व महिलांनी काम केलेले हे राज्यातील पहिले शासकिय रुग्णालय आहे. ज्यामध्ये फक्त महिलाच रुग्णांवर यशस्वी उपचार पद्धती राबवत असून याचा आम्हाला अभिमान आहे. यांच्या कामाचे कौतुक करताना अजुन काम करण्याची उमेद वाढत असल्याची तालुका वैद्यकिय आधिकारी बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले.