पुणे - येथील लोणावळा परिसरात १२ फुट लांब अजगर आढळला आहे. तर त्याची मान मोडल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर तळेगाव येथील पशु वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेऊन कात्रज प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. याठिकाणी त्याच्यावर अधिक उपचार करण्यात येईल, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
हेही वाचा - जोरदार पावसामुळे पुणेकरांची दैन्यवस्था; 11 जणांचा मृत्यू तर 4 जण बेपत्ता
महाराष्ट्रात अजगर ही जात दुर्मिळ होत चालली आहे. वन्यजीव कायद्यानुसार अजगराला संरक्षण दिले गेले आहे. लोणावळ्याच्या देवली या गावाच्या परिसरात १२ फूट लांबीचे महाकाय अजगर गावकऱ्यांना आढळले. त्यानुसार संबंधित गावकऱ्यांनी सर्प मित्रांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी जखमी अजगराला पकडून नेमके काय झाले ते पाहिले असता त्याची मान मोडल्याचे समोर आले.
हेही वाचा - पुण्यात अतिवृष्टीमुळे अनेक संसार उघड्यावर, समाजसेवी संस्थांनी दिला मदतीचा हात
त्यामुळे त्याला भक्ष्य गिळता येत नव्हते. यानंतर तात्काळ त्याला तळेगाव येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कात्रज प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले आहे. संग्रहालयात त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.