ETV Bharat / state

अडकलेला मांजा काढताना पाण्याच्या टाकीत पडल्याने अकरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

अथर्व हा रविवारी सकाळी आपल्या घराजवळ त्याच्या लहान भावाबरोबर पतंग उडवीत होता. पतंग उडवत असताना त्याचा मांजा जवळच तुकाई मंदिरावरील टेकडीवर जलशुद्धीकरणाच्या टाकीला अडकला. त्यानंतर टाकीवर चढून अथर्व मांजा काढण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला व तो जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला

author img

By

Published : Jan 20, 2020, 12:15 PM IST

pune
अथर्व बापू गोरे

पुणे- पतंग उडवीताना अडकलेला मांजा काढण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढलेल्या ११ वर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुःखद घटना वडगाव येथील तुकाई मंदिर टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्राजवळ घडली. अथर्व बापू गोरे, असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत अथर्वचे दृश्य

अथर्व हा हिंगणे खुर्द येथील जगताप महापालिका शाळेत पाचवीत शिकत होता. अथर्व हा रविवारी सकाळी आपल्या घराजवळ त्याच्या लहान भावाबरोबर पतंग उडवीत होता. पतंग उडवत असताना त्याचा मांजा जवळच तुकाई मंदिरावरील टेकवडीवर जलशुध्दीकरणाच्या टाकीला अडकला. त्यानंतर अथर्व आणि त्याचा लहान भाऊ मांजा काढण्यासाठी तेथे गेले. त्यानंतर टाकीवर चढून मांजा काढण्याचा प्रयत्न करत असताना अथर्वचा तोल गेला व तो जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथर्वला पाण्यातून बाहेर काढले. अथर्वच्या जाण्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- 'पंकजाताईंनी शुभेच्छा दिल्या त्याचा मनापासून आनंद'

Intro:
पतंग उडविताना अडकलेला मांजा काढताना पाण्याच्या टाकीत पडल्याने अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू, पुण्यातील दुःखद घटना

पतंग उडवीताना अडकलेला मांजा काढण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढलेल्या अकरा वर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुःखद घटना वडगाव येथील तुकाईमंदीर टेकडीवरील जलशुध्दीकरण केंद्राजवळ घडली. अथर्व बापू गोरे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सिंहगडरोड पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अथर्व हा हिंगणे खुर्द येथील जगताप महापालिका शाळेत पाचवीत शिकत होता. रविवारी सकाळी घराजवळ अथर्व हा त्याच्या लहान भावाबरोबर पतंग उडवीत होता. पतंग उडत असताना त्याचा मांजा जवळच तुकाईमंदीरावरील टेकवडीवर जलशुध्दीकरणाच्या टाकीला अडकला. त्यानंतर अथर्व आणि त्याचा लहान भाऊ मांजा काढण्यासाठी तेथे गेले. त्यानंतर टाकीवर चढून अथर्व मांजा काढण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचा तोल जाऊन जलशुध्दीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीत पडला. परंतु, त्याला पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्थवला पाण्यातून बाहेर काढले. अथर्वच्या जाण्यामुळे परिसराच एकच शोककळा पसरली. या अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत आहे.Body:।।Conclusion:।।।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.