पुणे - आजच्या युगात दहावी बारावीमध्ये मुलांना एक दोन टक्के कमी का ( 10th ) आले. पैकीच्या पैकी का मार्क मिळाले नाही याबाबत पालक चिंतेत असतात. जर कोणाला म्हटले की एखादा मुलगा नववीमध्ये नापास झाला आहे. आणि त्याने शाळा सोडली तर विश्वास बसणार नाही. पण ही परिस्थितीती खरी आहे आणि अनेक विद्यार्थी हे नववीत नापास झाले म्हणून शाळा सोडून देतात आणि काही वर्षांनी त्यांना शाळा सोडल्याचा पश्चाताप होतो. अश्या वेळेस दहावी तरी उत्तीर्ण व्हावी अशी या विद्यार्थ्यांची इच्छा ( 10th failed students ) असते. तेव्हा काय करावे हा प्रश्न सर्वांसमोर येतो. अश्या या नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मुळशी येथे राष्ट्रीय सर्वागीण ग्रामविकास संस्थेच्यावतीने हिम्मत शाळा सुरू करण्यात आली ( Mulshi Himmat School ) आहे. या शाळेत शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण देखील देण्यात येत आहे.
अशी झाली शाळेची सुरुवात - दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या कपाळी लागलेला नापास हा शिक्का पुसण्यासाठी मुळशी येथील राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यांनी मुळशी येथील अंबडवेट येथे नापासांची हिम्मत शाळा सुरू केली आहे. ही शाळा 2011-12 मध्ये सुरू करण्यात आली. शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात एक सर्वेक्षण केले की किती मुले ही शाळाबाह्य आहेत. त्यात एक लक्षात आले की बरेच विद्यार्थी हे शाळाबाह्य असून ज्यांनी नववी मध्येच नापास झाल्या कारणाने शाळा सोडून दिली आहे. मग अश्या मुलांसाठी हिम्मत शाळा ही सुरू करण्यात आली. दरवषी 30 ते 40 विद्यार्थी मग ते कोणत्याही वयाचे असो अश्या विद्यार्थ्यांना वर्षभर शिकवून उत्तीर्ण करण्याचा काम ही नापासांची शाळा हिम्मत शाळा करू लागली.
शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देखील दिले जाते - मुळशी तालुक्यातील बाल गुन्हेगारी संपवण्यासाठी येथील काही नागरिकांच्या पुढाकाराने हिम्मत शाळा म्हणजेच नापसांची शाळा सुरू केली गेली. आजपर्यंत मुलाने खूप दिवे लावलेत. यानंतर तरी काय दिवे लावणार या विचाराने पालक अशा मुलांचे शिक्षण थांबवतात. या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व स्तरातून नकारात्मक वागणूक मिळते. त्यातूनच ही मुले चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता असते. अशा मुलांना मानसिक त्रास सहन करावा लागायचा. याचा विचार करून आम्ही हिम्मत शाळा सुरू केली. इथे जो विद्यार्थी येतो त्याच 17 नंबर अर्ज भरून त्याला शाळेप्रमाणेच शिक्षण देण्याचे वर्षभर केले जात. याच बरोबर या शाळेत शैक्षणिक शिक्षणाबरोबर व्यवहारिक शिक्षण म्हणजे मोबाईल रीपीरिंग, इलेक्ट्रिक तसेच शेती विषयक प्रशिक्षण दिले जातात. या दोन्ही शिक्षणाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्याला शिक्षणात पुढे जायचे आहे, असे विद्यार्थी शिक्षणात पुढे जातात. तर ज्यांना व्यवहारात पुढे जायचे आहे ते व्यहरात पुढे जातात. अशी माहिती यावेळी संस्थेचे प्रकल्प पालक महेश मोहोळ यांनी दिली.
आज काही विद्यार्थी शिक्षणात तर काही विद्यार्थी करत आहे स्वतः चा रोजगार - नापास विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ओळखून त्याला खतपाणी मिळाले तर अशी मुले नक्कीच कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात नाव कमावल्याशिवाय रहात नाही. हा मानसशात्राचा आधार घेत या संस्थेने हा उपक्रम राबविण्याचा ध्यास घेतला आहे. या संस्थेत असे माजी विद्यार्थी आहे जे आज काही ना काही काम करत आहे.एक विद्यार्थी या संस्थेत असा आहे जो आज एमपीएससी ची तयारी करत आहे.तर एक विद्यार्थी असे आहेत ज्यांनी वयाच्या 53 व्या वर्षी दहावीची परीक्षा दिली आहे.तर काही विद्यार्थीने मोबाईल रेपेरिंग च दुकान टाकल आहे तर काही विद्यार्थी हे पुढे शिक्षण घेत आहे.गेल्या 2 ते 3 वर्षात नापासांचा प्रमाण जरी कमी झाला असला तरी ज्यांना दहावी उत्तीर्ण व्हायची आहे.असे विद्यार्थी प्रवेश घेत आहे.यंदा 13 ते 15 विद्यार्थ्यांचं प्रवेश झाला असून या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यवहारिक ज्ञान देखील देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी कंपन्यांमध्ये देखील पाठवल जाते - हिम्मत शाळेत पहाटेच्या उपासनेपासून सुरू झालेली दिनचर्या व्यायाम श्रमदान शालेय विषयांचा अभ्यास, स्वयंअध्ययन दुपारच्या विश्रातीनंतर औद्योगिक विषयाचा अभ्यास, कॅरम, बुद्धीबळ, डॉलोबॉल, व रात्रीचा अभ्यास करून होतो.अभ्यासक्रमचा कालावधीत वर्षभराचा असून पहिल्या टप्पात शालेय विषयांचे संपूर्ण अध्यापन व व्यवस्थापक करून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयाच्या कामाचा अनुभव यावा याकरिता पिरंगुट येथील परिसरातील विविध कंपन्यामध्ये प्रशिक्षणासाठी देखील पाठविले जाते.
पहा माजी विद्यार्थ्यांचे अनुभव - ५५ वर्ष वयाचे एक अप्पासाहेब शेळके पिरंगुटमधे स्वतःच्या मालकीचे एक मंगल कार्यालय, इंडस्ट्रीयल शेड्स, शेती आणि पिंपरीमध्ये एका मॉलचे मालक. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या आज सुमारे २००० व्यक्तींना आबांच्या उद्योग समूहामुळे रोजगार मिळवून देणारे लहानपणी परिस्थिती मुळे नववीच्या पुढे शिक्षण होऊ शकले नाही परंतु धडाडीने केलेल्या कष्टांमुळे आज हे यश गाठू शकले.पण पुढे व्यवसाय वाढवत असताना ज्या कागदपत्रांची गरज होती त्यात दहावी उत्तीर्ण आवश्यक होत.अश्या वेळेस अप्पासाहेब म्हणजेच अप्पा यांनी वयाच्या 53 व्या वर्षी हिम्मत शाळेत प्रवेश केला आणि 53 टक्क्यांनी उत्तीर्ण देखील झाले.तब्बल 38 वर्षानंतर परीक्षा देणाऱ्या अप्पांनी सर्व श्रेय हा हिम्मत शाळेला दिला आहे.
हिम्मत शाळेची आगळी वेगळी ओळख - 3 ते 4 वर्षापूर्वी मुळशी तालुक्यातील गुन्हेगारीवर मुळशी पॅटर्न हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने धुमाकूळ देखील घातलं. पण अश्या या मुळशी तालुक्यात मुळशीतील हिम्मत शाळेचा पॅटर्न देखील आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.