पुणे- जिल्ह्यातील शिरूर येथून पळून गेलेले तबलीगचे १० लोक हे २३ फेब्रुवारीला पुण्यात आले होते. हे १० लोक मरकझ नंतर पुण्यात आलेले नसून ते आधीच पुण्यात आले होते, असा खुलासा पुणे विभागीय पोलीस आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केला आहे.
तबलीगचे 10 लोक जिल्ह्यातल्या शिरूर येथून पळून गेल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हा खुलासा केला आहे. पुण्यातील ज्या १० लोकांनी निजामुद्दिन येथील मरकझमध्ये सहभाग घेतला होता त्यांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, यावर हे १० लोक मरकजच्या आधीच पुण्यात आले होते, असे आयुक्तनी स्पष्ट केले आहे. हे १० लोक २१ फेब्रुवारीला दिल्लीहून पुण्याला आले होते आणि पुण्यातच ६ मार्चपर्यंत होते. ६ मार्चला हे लोक शिरुरमधे शिफ्ट झाले. शिरुरच्या एका मस्जिदमध्ये ते थांबलेले होते. १ एप्रिलला जेव्हा दिल्लीची निजामुद्दिनची घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांना विलगीकरणाचे शिक्के मारण्यात आले. मात्र, ते लोक फरार झाले आहेत.
वैद्यकीय औषध घेवून जाणाऱ्या ट्रकमधून ते फरार झाले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे मोबाईल नंबर आमच्याकडे आहेत. सीडीआरवरून त्यांचे छडा लावल्या जात आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. परंतु, निजामुद्दिन येथील कार्यक्रमात सहभागींची जी यादी देण्यात आली आहे, त्यामध्ये या व्यक्तींची नावे नव्हती आणि हे त्यापैकी आहेत, असे आमच्या रेकॉर्डवरून तरी स्पष्ट होत नाही, असे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले. या १० लोकांचा तबलिगीशी संबंध आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच त्यांचा शोध सुरू आहे. विभागीय पोलीस आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- फॅमिली कोर्ट असोसिएशन ज्युनिअर वकिलांच्या पाठीशी; पुरवणार दोन महिन्यांचे अन्नधान्य