पुणे - सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले. मुंबईसह पुण्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 18 झाली आहे. मागील चोवीस तासात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. बुधवारी तब्बल 10 रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात कोरोनाबाधितांची मृत्यूची संख्या 18 वर पोचली आहे. यामध्ये ससून रुग्णालयात 11, नायडू हॉस्पिटलमध्ये 1, नोबल 2, इनामदार हॉस्पिटलमध्ये 1, औंध सिव्हिल रुग्णालयात 1, डीएमएच रुग्णालयात 1, सह्याद्री हॉस्पिटल 1 यांचा समावेश आहे.