पुणे - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरला श्रावण मासानिमित्त देशभरातून असंख्य भाविक दर्शनासाठी येत आहेत. मंदिराच्या प्रथम द्वारातून प्रवेश करत असताना प्राचीन काळातील पंचधातूपासून तयार केलेली १ हजार किलोची घंटा पहायला मिळत आहे. ही घंटा भाविकांचे मुख्य आकर्षण बनत आहे.
सन १७२७ साली चिमाजीआप्पा पेशवे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पंचधातूपासून तयार केलेली सुमारे १ हजार किलोची घंटा भीमाशंकर चरणी अर्पण केली. तेव्हापासून ही घंटा आजही अगदी दिमाखात उभी आहे. शनिदेवाच्या मंदिराच्या अगदी समोरच ही घंटा असून भीमाशंकरला येणारा प्रत्येक भाविक या पंचधातूच्या घंटेला हात लावूनच शंभू महादेवाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतो.
प्राचीनकालीन पंचधातूपासून तयार करण्यात आलेल्या या घंटाला एक वेगळे महत्त्व आहे. असे म्हटले जाते, की पंचधातूपासून ऊर्जा मिळते. त्यामुळेच याठिकाणी येणारा प्रत्येक भाविक या प्राचीन काळातील घंटेला हात लावूनच पुढे जातो.