पुणे- विभागातील १ हजार २३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ३ हजार ३६५ इतकी झाली आहे. तर अॅक्टीव रुग्ण १ हजार ९५३ इतके आहेत. विभागात १७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तसेच ११५ रुग्ण गंभीर असून उर्वरित रुग्ण निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात २ हजार ९२६ कोरोनाबाधित रुग्ण असून १ हजार १३९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या ही १ हजार ६३० आहे. जिल्ह्यात १५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच १०७ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. सातारा जिल्ह्यात ११९ कोरोनाबाधित रुग्ण असून २० कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या ही ९७ आहे. २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात २६४ कोरोनाबाधित रुग्ण असून ४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या ही २०९ इतकी आहे. जिल्ह्यात एकूण १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील ३८ कोरोनाबाधित रुग्ण असून २८ कोरोनाबाधित रुग्ण हे बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या ही ९ आहे. जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १८ कोरोनाबाधित रुग्ण असून ९ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या ही ८ आहे. जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकूण ३४ हजार ६४ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३२ हजार ३६६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर, १ हजार ६७१ नमुन्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी २८ हजार ९६९ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ३ हजार ३६५ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत विभागामधील ९२ लाख ९९ हजार ८७६ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत ४ कोटी २ लाख ३२ हजार ७१४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २ हजार १७६ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.
पुणे विभागातून परप्रांतीय व्यक्तीसाठी देण्यात आलेली रेल्वेची सुविधा
पुणे विभागातून मध्यप्रदेशासाठी- ४, उत्तर प्रदेशासाठी- २, उत्तराखंडसाठी- १, तामिळनाडूसाठी-१ अशी रेल्वे सुविधा करण्यात आली आहे. तसेच, जबलपूरसाठी (म.प्र.), जयपूरसाठी (राजस्थान) एकूण १० रेल्वे रवाना झाल्या आहेत.
हेही वाचा- "कोरोना से डरना नही तो लढना है" म्हणत कामगारांच्या धैर्याला पोलीसांनी टाळ्या वाजवत दिली सलामी