पुणे - माळशेज घाटमार्गे जाणाऱ्या कल्याण-नगर महामार्गावरील पिंपरी पेंढार येथे एसटी बस व दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला आहे. निलेश बाम्हणे (वय २५) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मागील अनेक दिवसांपासून कल्याण-नगर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. आज दुपारच्या सुमारास कल्याणकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक लागून अपघात झाला आहे. या महामार्गलगत लोकवस्ती आहे. तर महामार्गावरून माळशेजमार्गे मुंबईकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे लोकवस्तीलगत अपघात वाढत चालले आहेत.
कल्याण-नगर महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.