ETV Bharat / state

Corona update : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापडला कोरोनाबाधित, राज्यभरात यंत्रणा अलर्ट - महाराष्ट्र कोरोना अपडेट

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा जगभराची चिंता वाढवली आहे. चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सर्व देशांनी दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. भारतातही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ( Pune International Airport infected ) सर्व राज्यांना पत्र लिहित कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यातच आता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेला १ रुग्ण कोरोनाबाधित ( 1 patient landed at Pune ) आढळून आला आहे.

Pune corona update
पुणे कोरोना अपडेट
author img

By

Published : Dec 28, 2022, 10:18 AM IST

Updated : Dec 28, 2022, 9:58 PM IST

डॉ. कमलेश सुर्यवंशी माहिती देताना

मुंबई/पुणे : पुणे विमानतळावर या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात तो कोरोनाबाधित आढळून आला आहे. कोरोना तपासणीसाठी नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यात या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाला कोणत्या व्हेरियंटचा कोरोना ( international passenger corona infected in Pune ) झाला आहे, याचा रिपोर्ट येणे बाकी आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे ५४ सक्रिय रुग्ण ( Pune corona update ) आहे. चीनसह इतर देशांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाने भारतात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे महापालिकेच्यावतीने पुणे आंतरराष्ट्रिय विमानतळावर थर्मल स्कॅनिंगदेखील सुरू ( Thermal scanning at pune airport ) करण्यात आले आहे.

ऑक्सिजन प्लांट वाढवण्यासाठी निर्णय : राज्याचे विदर्भ, मराठवाडा, खान्देश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी 25 मेट्रिक टन ते पाचशे मीटर एवढे ऑक्सिजन उपलब्ध होईल असे ऑक्सिजन प्लांट आहेत. मुंबई, पुणे, व नागपूर या शहरांसाठी त्यापेक्षा अधिक मॅट्रिक टनाची सोय व्हावी याबाबत शासनाने तशी तयारी केलेली आहे. मोठी महानगर या ठिकाणी पाचशे मीटर आणि त्याच्या पुढे इतका साठा असलेले ऑक्सिजन प्लांट शासनाने मे 2021 च्या शासन निर्णयानुसारच तयार करण्याचे ठरवले होते. त्यानुसार आज राज्यामध्ये पुरेशी व्यवस्था आहे.

मुंबईत कोरोनाने शून्य मृत्यू : मुंबईमध्ये मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूचा ( Mumbai corona status ) प्रसार सुरू झाला. हा प्रसार सुरू होताच रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. रुग्णांचा मृत्यू होऊ लागल्याने लॉकडाऊन लावण्यात आला. मुंबईतील कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी ट्रेसिंग ट्रॅकिंग ट्रिटिंग, धारावी मॉडेल, मुंबई मॉडेल आदी उपाययोजना करण्यात आल्या. (zero death was reported among corona patients in Mumbai) या उपाययोजनांची दखल जगभरात घेण्यात आली. मुंबईत गेल्या अडीच वर्षात 11 लाख 55 हजार 93 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 11 लाख 35 हजार 297 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी : पुण्यात पहिल्या कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर आता पुणे विमानतळावर एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने काय उपाययोजना केल्यात याची माहिती महानगरपालिकाचे आरोग्य सहाय्यक अधिकारी डॉ. संजय वावरे यांनी दिली आहे. गेल्या आठ दिवसांपासून महापालिकेच्या वतीने विमानतळावरती येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. प्राथमिक स्वरूपात ही थर्मल स्क्रीनिंग केली जात असल्याची माहिती वावरे यांनी दिलेली आहे. साधारणपणे दीडशे ते दोनशे नागरिकांची, जे बाहेर देशातून भारतात परतत आहेत. त्यांचीही स्क्रीनिंग केली जात आहे.त्यानंतर त्यांच्या रिपोर्टनुसार त्यांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. प्रामुख्याने जपान कोरिया आणि चायना या देशातून जे प्रवास करून आलेले नागरिक आहेत त्यांची ही तपासणी केली जात आहे.

डॉ. संजीव वावरे माहिती देताना

पुण्यात आरोग्य यंत्रणा अलर्टवर : थर्मल स्क्रीनिंग नंतर आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आला तर त्याच्यावर पुढील उपचार केले जातात त्यानंतर सुद्धा जुनून सिक्वेन्स नावाची एक तपासणी आहे. त्याचा रिपोर्ट यायला आणखी सात ते आठ दिवस लागतील त्यानंतरच आपल्याला त्या रुग्णाबद्दल माहिती अधिक मिळेल असेही डॉ. संजीव वावरे म्हणाले आहेत. तसेच महापालिकेकडून सध्या शहारत 12 स्वाब सेंटर सुरू करण्यात आली आहेत. महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये तयारी करून ठेवण्यात आलेली आहे. पुणे शहरात सध्या 35 ॲक्टिव रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. कोणीही घाबरून जाऊ नका सध्या जे रुग्णाचे प्रमाण आहे ते अतिशय कमी असल्याचे सुद्धा यावेळी डॉक्टरांनी सांगितलेले आहे.

अशी आहे राज्यातील कोरोना स्थिती : महाराष्ट्र राज्यात ( Maharashtra corona update ) 25 डिसेंबरच्या आकडेवारीनुसार रात्री बारा वाजेपर्यंत 148 कोविड रुग्णाचे निदान झालेले आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक संख्या 50 ठाणे जिल्ह्यात 10 तर पुणे जिल्ह्यात 42 रुग्ण आणि अकोला येथे 15 कोविड रुग्णांची नोंद झालेली आहे. दोन अंकी कोविड सक्रिय रुग्ण संख्या आलेले कमी जिल्हे आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप एकही कोविड रुग्ण ऍक्टिव्ह नाही तर काही जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन अशी संख्या आहे. ह्या बाबत नर्सेस संघटनेच्या कार्यकर्त्या त्रिशिला कांबळे यांनी सांगितले की, यात जर वाढ झाली तर मनुष्यबळ पुरेसे नाही. सरकार पाहिजे तेवढे मनुष्यबळ वेळीच पुरवत नाही विविध साधनांची पूर्तता वेळीच होत नाही मग उद्या हाहाकार उडाल्यास नवल कसले.

Last Updated : Dec 28, 2022, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.