ETV Bharat / state

परभणी : तरुणाला जिवंत जाळणाऱ्या पाच आरोपींना अटक

सेलू तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे एका 30 वर्षीय तरुणाच्या अंगावर 15 लिटर पेट्रोलची कॅन ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. सतीश बरसाले (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथून ५ आरोपींना रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे.

तरुणाला जिवंत जाळणाऱ्या पाच आरोपींना अटक
author img

By

Published : Jun 16, 2019, 10:09 PM IST

परभणी- सेलू तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे एका 30 वर्षीय तरुणाच्या अंगावर 15 लिटर पेट्रोलची कॅन ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. सतीश बरसाले (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथून ५ आरोपींना रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे.

उद्धव खोसे, दिगंबर खोसे, राजेभाऊ खोसे, दत्ता खोसे आणि जीवन खोसे (रा. ब्राह्मणगाव ता. सेलू) अशी या पाच आरोपींची नावे आहेत. घटना घडल्यानंतर हे आरोपी फरार झाले होते. तेव्हापासून ते सेलू तालुक्यातील देवगाव फाटा या ठिकाणी दडून बसले होते.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी सायंकाळी चार वाजता देवगाव फाटा येथे सापळा रचला आणि त्यांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, विभागीय पोलीस अधिकारी एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, रामोड, लोकूळवार, आप्पा वराडे यांनी या आरोपींना ताब्यात घेतले आहे.

वादाचे पर्यावसन हत्येत-
सेलू तालुक्यातील वालूर रस्त्यावरील ब्राम्हणगाव येथे शनिवारी सकाळी कॅनल कॅम्पजवळ खोसे आणि बरसाले कुंटुबीयात वाद झाला होता. घरासमोरील नाली काढणे आणि ओटा तोडल्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद टोकाला गेला. यातूनच खोसे कुटुंबीयातील चार ते पाच जणांनी ३० वर्षीय सतीश बरसाले याला बेदम मारहाण केली. मारहाण करून ते थांबले नाही, तर एकाने पेट्रोलने भरलेली कॅन सतीश बरसाले यांच्या अंगावर ओतली आणि दुसऱ्याने त्यास लगेच पेटवून दिले. क्षर्णाधात या पेट्रोलने पेट घेतल्याने सतीश बरसालेचा अक्षरशः कोळसा झाला. दरम्यान, मृत सतीश बरसाले यांच्या आई व पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

Intro:परभणी - नाली काढण्याच्या किरकोळ वादातून 30 वर्षीय तरुणाच्या अंगावर 15 लिटर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. घटना घडल्यानंतर फरार झालेल्या या आरोपींना पोलिसांनी सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथून रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.Body:उद्धव खोसे, दिगंबर खोसे, राजेभाऊ खोसे, दत्ता खोसे आणि जीवन खोसे (सर्व रा. ब्राह्मणगाव ता. सेलू) असे या पाच आरोपींची नावे आहेत. घटना घडल्यानंतर हे आरोपी फरार झाले होते. तेव्हापासून ते सेलू तालुक्यातीलच देवगाव फाटा या ठिकाणी दडून बसले होते. त्यांना पकडण्यासाठी सेलू पोलिसांनी विविध ठिकाणी पथके पाठवली. त्यात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी सायंकाळी चार वाजता देवगाव फाटा येथे सापळा रचण्यात आला. या ठिकाणी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, विभागीय पोलीस अधिकारी एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, रामोड, लोकूळवार, आप्पा वराडे यांनी या आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान, सेलू तालुक्यातील वालूर रोडवरील ब्राम्हणगांव येथे शनिवारी सकाळी कॅनल कॅम्प जवळ खोसे आणि बरसाले कुंटुबीयात वाद झाला होता. घरा समोरील नाली काढणे आणि ओटा तोडल्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद टोकाला गेला. यातूनच खोसे कुटुबियातील वरील पाच जणांनी ३० वर्षीय सतीश बरसाले याला बेदम मारहाण केली. मारहाण करून ते थांबले नाही, तर एकाने पेट्रोलने भरलेली कॅन सतीष बरसाले यांच्या अंगावर ओतली आणि दुसऱ्याने त्यास लगेच काडी लावून पेटवून दिले. क्षर्णाधात या पेट्रोलने पेट घेतल्याने सतीश बरसाले जीवंत जाळून अक्षरशः कोळसा झाला.
या घटनेनंतर परिसरातील नागरीकांना मोठी गर्दी केली होती. घटनास्थळावरून सर्व आरोपी फरार झाले होते. दरम्यान, मयत सतीश बरसाले यांच्या आई व पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- आरोपींसह सेलू पोलिसांचा फोटोConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.