ETV Bharat / state

परभणीला १५ दिवसाआड पाणी; सप्टेंबर अखेर कार्यन्वित होणार नवीन योजना

सध्या नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून, या पाईपलाईनमधून सप्टेंबर अखेर दरडोई १३५ लिटर पाणी दिले जाईल, अशी तयारी मनपाने केली आहे. सध्याच्या परिस्थितीत परभणी शहरात केवळ सात जुने जलकुंभ आहेत. ते केवळ दहा लाख लिटर क्षमतेचे आहेत. त्यामुळे मुबलक पाणीसाठा असूनसुद्धा आवश्यक साठवण होऊ शकत नाही.

परभणीला १५ दिवसाआड पाणी
author img

By

Published : May 27, 2019, 10:51 PM IST

परभणी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा असला तरी केवळ साठवणुकीसाठी आवश्यकता क्षमतेचे जलकुंभ नसल्याने सध्या १५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मनपाने सध्या शहरात ४२ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. सप्टेंबर अखेर नवीन योजनेचे पाणी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

साठवण नसल्याने परभणीला पंधरा दिवसाला पाणी

राहटी नदीच्या प्रकल्पातून शहराला पाणी येते तर या प्रकल्पात येलदरी धरणातून पाणी सोडले जाते. मात्र प्रत्यक्षात येलदरी धरण हे डिसेंबर महिन्यातच मृत साठ्यात गेले आहे. तसेच सुरुवातीपासून या धरणाचा गाळ उपसला नसल्याने सध्या या धरणात नेमका किती पाणीसाठा आहे आणि तो किती दिवस पुरेल, याचा अंदाज बांधणे सध्या तरी अवघड आहे. त्यातच पाऊस लाबल्याने परभणीकरांना आणखी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार, हे मात्र निश्चित.

दरम्यान, परभणी मनपाला येलदरी धरणातूनच पाइपलाइनच्या माध्यमातून नवीन पाणीपुरवठा योजना देण्यात आली आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, सप्टेंबरअखेर या योजनेच्या माध्यमातून परभणीकरांना पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती शहर अभियंता वाशिम वसीम पठाण यांनी दिली आहे. असे असले तरी सध्या ज्या बंधार्‍यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्या बंधाऱ्यात केवळ ५ जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. या बंधाऱ्यांची निर्मिती झाली, त्यावेळी शहराची लोकसंख्या केवळ एक ते दीड लाख होती. त्या दृष्टीने पाणीपुरवठा योजना निर्माण झाली होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत परभणी शहराची लोकसंख्या तीन लाखाहून अधिक झाली आहे. त्यामुळे ही योजना अपुरी पडते. परिणामी, शासनाने नवीन सुमारे दोनशे कोटी रुपयांची पाणी पुरवठ्याची अमृत योजना दिली आहे. या अमृत योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम होत आहे. या माध्यमातून शहराला नवीन ३ जलकुंभ बांधण्यात आले आहेत.

प्रत्येकी वीस लाख लिटरपेक्षा जास्त क्षमतेच्या जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून, या पाईपलाईनमधून सप्टेंबर अखेर दरडोई १३५ लिटर पाणी दिले जाईल, अशी तयारी मनपाने केली आहे. सध्याच्या परिस्थितीत परभणी शहरात केवळ सात जुने जलकुंभ आहेत. ते केवळ दहा लाख लिटर क्षमतेचे आहेत. त्यामुळे मुबलक पाणीसाठा असूनसुद्धा आवश्यक साठवण होऊ शकत नाही. याचा परिणाम परभणी शहराला पंधरा-पंधरा दिवसाला पाणी पुरवठा होतो. ज्यामुळे परभणीकर सध्या पाण्यासाठी भटकंती करत आहेत. अनेक स्लम भागांमध्ये तासनतास टँकरची वाट पाहावी लागत आहे. मनपाच्या मालकीच्या पाच टँकरसह इतर ४२ खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी लवकरात लवकर नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून परभणीकरांना मुबलक पाणी देण्यात यावे, अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.

Intro:परभणी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा असला तरी केवळ साठवणुकीसाठी आवश्यकता क्षमतेचे जलकुंभ नसल्याने सध्या 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मनपाने सध्या शहरात 42 टँकरच्या माध्यमातून पाणी देण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, राहटी नदीच्या प्रकल्पातून शहराला पाणी येते तर या प्रकल्पात येलदरी धरणातून पाणी सोडले जाते. मात्र प्रत्यक्षात येलदरी धरण हे डिसेंबर महिन्यातच मृतसाठ्यात गेले आहे. तसेच सुरुवातीपासून या धरणाचा गाळ उपसला नसल्याने सध्या या धरणात नेमका किती पाणीसाठा आहे आणि तो किती दिवस पुरेल, याचा अंदाज बांधणे सध्या तरी अवघड आहे. त्यातच पावसाला लांबल्यास परभणीकरांना आणखीन तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार, हे मात्र निश्चित.

Body:दरम्यान, परभणी मनपाला येलदरी धरणातूनच पाइपलाइनच्या माध्यमातून नवीन पाणीपुरवठा योजना देण्यात आली आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, सप्टेंबरअखेर या योजनेच्या माध्यमातून परभणीकरांना पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती शहर अभियंता वाशिम वसीम पठान यांनी दिली आहे. असे असले तरी सध्या ज्या बंधार्‍यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्या बंधाऱ्यात केवळ पाच जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. या बंधाऱ्यांची निर्मिती झाली, त्यावेळी शहराची लोकसंख्या केवळ एक ते दीड लाख होती. त्या दृष्टीने पाणीपुरवठा योजना निर्माण झाली होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत परभणी शहराची लोकसंख्या तीन लाखाहून अधिक झाली आहे. त्यामुळे ही योजना अपुरी पडते. परिणामी, शासनाने नवीन सुमारे दोनशे कोटी रुपयांची पाणी पुरवठ्याची अमृत योजना दिली आहे. या अमृत योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम होत आहे. या माध्यमातून शहराला नवीन तीन जलकुंभ बांधण्यात आले आहेत प्रत्येकी वीस लाख लिटरपेक्षा जास्त क्षमतेच्या जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून, या पाईपलाईन मधून सप्टेंबरअखेर दरडोई 135 लिटर पाणी दिले जाईल, अशी तयारी मनपाने केली आहे. सध्याच्या परिस्थितीत परभणी शहरात केवळ सात जुने जलकुंभ आहेत. ते केवळ दहा लाख लिटर क्षमतेचे आहेत. त्यामुळे मुबलक पाणीसाठा असून सुद्धा आवश्यक साठवण होऊ शकत नाही. याचा परिणाम परभणी शहराला पंधरा-पंधरा दिवसाला पाणी पुरवठा होतो. ज्यामुळे परभणीकर सध्या पाण्यासाठी भटकंती करत आहेत. अनेक स्लम भागांमध्ये तासनतास टँकरची वाट पाहावी लागत आहे. मनपाच्या मालकीच्या पाच टँकरसह इतर 42 खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी लवकरात लवकर नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून परभणीकरांना मुबलक पाणी देण्यात यावे, अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :-vis with vv.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.