ETV Bharat / state

परभणीच्या नागरी क्षेत्रात दोन दिवस संचारबंदी; मात्र 7 ते 11 अत्यावश्यक अस्थापनांना सूट

परभणी जिल्ह्यातील सर्व नागरी भागात दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या दोन दिवसांमध्ये सकाळी 7 ते 11 या कालावधीत अत्यावश्यक सेवांना तथा आस्थापनांना सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये किराणा आणि भाजीपाला आदींचा समावेश असेल.

Two-day curfew in Parbhani urban area
परभणीच्या नागरी क्षेत्रात दोन दिवस संचारबंदी
author img

By

Published : Jul 31, 2020, 8:20 PM IST

परभणी - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लॉकडाऊनमध्ये देखील वाढ होताना दिसून येते. याच पार्श्वभूमीवर उद्या, शनिवार आणि त्यानंतर रविवारी देखील जिल्ह्यातील सर्व नागरी भागात दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या दोन दिवसांमध्ये सकाळी 7 ते 11 या कालावधीत अत्यावश्यक सेवांना तथा आस्थापनांना सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये किराणा आणि भाजीपाला आदींचा समावेश असेल.

Two-day curfew in Parbhani urban area
परभणीच्या नागरी क्षेत्रात दोन दिवस संचारबंदी

या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढलेल्या आदेशात आज (शुक्रवारी) संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनचा सुरुवातीचा दीड महिन्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यानंतर जून महिन्याच्या शेवटपर्यंत मात्र 100 रुग्णांची भरती झाली होती. तोपर्यंत देखील परभणी जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत होते; मात्र पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि रेड झोन मधील जिल्ह्यांमधून नागरिकांचे लोंढे येण्यास सुरू झाले आणि जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा एकदम 6 पट होवून बसला आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. सध्या परिस्थिती सव्वासहाशे हून अधिक कोरोनाबाधित रूग्ण जिल्ह्यात झाले असून, त्यापैकी जवळपास 300 रुग्णांवर कोरोना संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत, तर दररोज 50 हून अधिक संभाव्य रुग्णांची देखील तपासणी केली जात आहेत. एकूणच जिल्ह्यातील वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडून वारंवार संचारबंदी लावली जात आहे. त्यानुसार आज सायंकाळी पाच वाजल्यापासून रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे दोन दिवस नागरी क्षेत्रात संचारबंदी लागू असेल. ज्यामध्ये परभणी महानगरपालिका हद्द व त्या लगतचा 5 किमी परिसर तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका हद्द व लगतचा 3 किमीच्या परिसरात ही संचारबंदी राहणार आहे.

या दरम्यान, सकाळी 7 ते 11 या कालावधीत बाजारपेठेतील यापूर्वी सूट देण्यात आलेल्या अत्यावश्यक बाबी आणि व्यापारी आस्थापनांना सूट देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. तसेच या संचारबंदी मधून शासकीय कार्यालय, त्यांचे कर्मचारी, वाहने, वैद्यकीय सुविधा, एनजीओं प्रतिनिधी, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्तीं, माध्यमांचे प्रतिनिधी, पेट्रोल पंप व गॅस वितरक यांच्यासह दुध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9, राष्ट्रीयकृत शेड्युल्ड बँका, खासगी बँका, नागरी, सहकारी बँकांना केवळ केवळ रास्तभाव दुकानदार, पेट्रोलपंप चालक, गॅस वितरक, कृषी साहित्य विक्री केंद्र यांच्याकडून चालनाद्वारे पैसे भरून घेणे, बँकेची ग्रामीण भागात रोकड पोहचविण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे. तसेच महा ई सेवा केंद्र, सीएससी सेंटर यांना संध्याकाळी 10 पर्यंत सुट राहिल. तसेच सलून दुकानदारांना (सकाळी 7 ते 11) वगळण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.