परभणी - मागील पाच दिवसांपासून परभणी जिल्ह्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी (दि. 30 जून) तीन रुग्ण आढळून आल्यानंतर आज बुधवारीदेखील (दि. 1 जुलै) जिल्ह्यात 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या 3 रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण किरोनाबधितांची संख्या आता 118 एवढी झाली आहे. त्यातील 91 जणांची बरे झाल्याने सुट्टी झाली असून, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 23 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी (दि. 1 जुलै) सकाळी सोनपेठ येथे नोकरीस असलेल्या व परभणीतील ममता कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या 44 वर्षीय पुरुष रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या प्रमाणेच पाथरी येथील आनंद नगर येथे राहणाऱ्या 29 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. तसेच परभणी शहरातील रामकृष्ण नगरात राहणाऱ्या एका युवती कोरोना अहवाल देखील पॉझिटीव्ह आला आहे. ही युवती यापूर्वी रामकृष्ण नगरातच यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या डॉक्टरच्या रुग्णाची हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहे.
ती देखील परभणी शहरातील रामकृष्ण नगरातील रहिवासी आहे. दरम्यान, या तीन रुग्णांसह परभणी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 118 एवढी झाली आहे. यातील 4 जणांचा यापूर्वीच विविध आजाराने ग्रस्त असल्याने मृत्यू झाला आहे. तर 91 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित 23 रुग्णांवर आता परभणीच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णांची सद्यपरिस्थितीत प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासना कडून मिळाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 680 संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी 2 हजार 633 जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आलेे. तर काल संध्याकाळी 8 जणांचे स्वॅब नमुने प्रलंबित आहेत. या शिवाय 83 रुग्णांचे अहवाल अनिर्णायक असून 47 जणांचे स्वॅब नमुने तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा नांदेडच्या प्रयोग शाळेने दिला आहे.
हेही वाचा - संत जनाबाईंच्या पालखी सोहळ्याला परवानगी नाकारली; वारकरी संप्रदायाकडून प्रशासनाचा निषेध