ETV Bharat / state

पहिल्याच पावसानंतर परभणी-जिंतूर महामार्ग चिखलमय, वाहन चालकांची कसरत - परभणी-जिंतूर महामार्ग

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे या रस्त्याचे काम पुन्हा ठप्प झाले. अडीच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रस्ते कामास सुरूवात झाली. पण, मागील दोन दिवसांत पहिल्याच पावसामुळे या रस्त्यावरील मुरूम व काळ्या मातीमुळे येथे चिखल झाला आहे. यामुळे सतत वाहने घसरत असल्याने वाहनाचेही नुकसान होते आहे. शासनाने यावर उपाय करावा, अशी मागणी नागरिकांमधून होते आहे.

muddy road of parbhani
चिखलमय रस्ता
author img

By

Published : Jun 4, 2020, 8:14 AM IST

परभणी - रुंदीकरणाच्या कामासाठी २०१७ पासून परभणी-जिंतूर राज्यमार्ग खोदून ठेवण्यात आला आहे. हे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने पावसाळ्यात हा राज्यमार्ग चिखलमय होतो. त्यामुळे वाहने घसरून दररोज लहान-मोठे अपघात घडत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. धर्मपुरी, टाकळी, नांदापूर या गावादरम्यानच्या रस्त्यावर वाहनचालकांची मोठी तारांबळ उडत असून, या चिखलमय रस्त्यावरून अनेक वाहने घसरत आहेत, तसेच वाहन चिखलात रुतुन बसत असल्याच्याही घटना समोर येत आहेत.

परभणी-जिंतूर महामार्ग बनला चिखलमय,

परभणी-जिंतूर या 42 किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कंत्राटदाराने मुळचा डांबरी रस्ता खोदून ठेवला. 20 सप्टेंबर, 2017 रोजी सुरू झालेले हे काम 2019 मध्ये पूर्ण करायचे होते. त्यावर एकूण 212 कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र, प्रत्यक्षात अजूनही या रस्त्याचे काम रेंगाळलेलेच आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा झाडे कापण्यात आली आहेत. त्यानंतर दुतर्फा मोठमोठ्या मशिनद्वारे खोदकाम करून मुरूमासह खडीने भराव टाकण्याचे काम सुरू केले. त्यावेळी रस्त्याचे काम वेळे अधिच पूर्ण होईल, असे वाटत होते. पण, कंत्राटदारास काही आजी-माजी लोकप्रतिनिधींनी त्रास दिल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून एकमेकांवर झाले. कदाचित ही बाब सत्य असेल म्हणून संबंधीत कंत्राटदाराने हे काम अजुनही पूर्ण केले नाही.

रस्त्याचे काम ठप्प झाल्यामुळे विभागीय महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी स्वतः हस्तक्षेप केला होता. त्यानंतर या रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली. नवीन कंत्राटरांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे काही ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याचे एकेरी, तर काही भागात दुहेरी काम पूर्ण झाले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे या रस्त्याचे काम पुन्हा ठप्प झाले. अडीच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रस्ते कामास सुरूवात झाली. पण, मागील दोन दिवसांत पहिल्याच पावसामुळे या रस्त्यावरील मुरूम व काळ्या मातीमुळे येथे चिखल झाला आहे. यामुळे सतत वाहने घसरत असल्याने वाहनाचेही नुकसान होते आहे. शासनाने यावर उपाय करावा, अशी मागणी नागरिकांमधून होते आहे.

हेही वाचा - 'शाळा सुरू करण्याची घाई नको'- परभणीत शिक्षण संस्थांच्या संघटनेची भूमिका

हेही वाचा - परभणीतील 6 हजार कोरोना योद्धांना होमिओपॅथिक औषधांचे वाटप, 'एचएआरसी' संस्थेचा उपक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.